शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राविरुद्ध मुंबईचा भक्कम प्रारंभ

By admin | Updated: October 18, 2016 04:18 IST

कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राविरुद्ध भक्कम प्रारंभ करताना मुंबईने सोमवारी, पहिल्या दिवशी ४ बाद २७३ धावा केल्या

पुणे : कर्नल सी. के. नायडू चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान महाराष्ट्राविरुद्ध भक्कम प्रारंभ करताना मुंबईने सोमवारी, पहिल्या दिवशी ४ बाद २७३ धावा केल्या. महाराष्ट्राचा माजी खेळाडू असलेला पुण्याचा शुभम रांजणे याने मुंबईतर्फे झळकावलेले नाबाद अर्धशतक आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर आजपासून ही ४ दिवसीय लढत सुरू झाली. बीसीसीआयतर्फे आयोजित २३ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेतील या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा १३७ चेंडूंत ३ षटकार आणि १० चौकार लगावणारा शुभम ८७ धावांवर, तर साईराज पाटील १२२ चेंडूंत १ षटकार व १० चौकारांसह ७८ धावांवर खेळ होते. सलामीवीर वैदिक मूरकर यानेही ५२ धावांचे (१२२ चेंडूंत ७ चौकार) योगदान दिले. महाराष्ट्रातर्फे प्रदीप दाढे याने प्रभावी मारा करताना ५८ धावांत ३ बळी घेतले.आकर्षित गोमेल आणि वैदिक मूरकर यांनी मुंबईला ७४ धावांची सावध सलामी दिली. जगदीश झोपेने आकर्षितला पायचित करून महाराष्ट्राला पहिले यश मिळवून दिले. मुंबईने शतकाची वेस ओलांडल्यानंतर वैदिक प्रदीप दाढेच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्या वेळी मुंबईच्या २ बाद १०७ धावा झाल्या होत्या. याच धावसंख्येवर मुंबईचा कर्णधार एकनाथ केरकर याला शून्यावर बाद करून दाढेने महाराष्ट्राला मोठे यश मिळवून दिले. त्याने विक्रांत आवटीला बाद करून मुंबईची अवस्था ४ बाद १११ अशी केली.अवघ्या ४ धावांच्या अंतरात ३ महत्वाचे फलंदाज बाद झाल्याने मुंबईचा संघ दबावाखाली आला होता. अशा कठीण परिस्थिीतीतून शुभम-साईश्राज जोडीने मुंबईला सावरले. (क्रीडा प्रतिनिधी)>संक्षिप्त धावफलक : मुंबई : पहिला डाव : ४ बाद २७३ (शुभम रांजणे खेळत आहे ८७, साईराज पाटील खेळत आहे ७८, वैदिक मूरकर ५२, आकर्षित गोमेल ३९, प्रदीप दाढे ३/५८, जगदीश झोपे १/७२).