शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा 'श्रीगणेशा'

By admin | Updated: April 20, 2015 15:13 IST

फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी झाल्याने मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला वहिला विजय मिळाला.

बंगलोर - फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अप्रतिम कामगिरी झाल्याने मुंबई इंडियन्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला वहिला विजय मिळाला. बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या सामन्यात मुंबईने रॉयल चॅलेंर्जस बंगलोर संघाला १८ धावांनी हरविले. २७ धावांत तीन बळी घेणारा हरभजन सामनावीर ठरला.

पराभवाचा ‘चौकार’ सहन करणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध फलंदाजीत ‘दम’ दाखवला. लेंडल सिमन्स (५९) आणि उन्मुक्त चंद (५८) यांच्या तडफदार अर्धशतकांच्या बळावर मुंबईने बंगळुरुपुढे ‘द्विशतकी’ आव्हान उभे केले. त्यांनी २० षटकांत ७ बाद २०९ धावा केल्या. गेल्या चार सामन्यांतील मुंबईची ही सर्वांत मोठी धावसंख्या ठरली. दुसरीकडे, नव्याने संधी देण्यात आलेल्या बंगळुरुच्या डेव्हिड विजे या गोलंदाजाने छाप सोडली. त्याने ४ बळी घेतले. मुंबई संघात दोन बदल करण्यात आले. कोरी अँडरसनच्या जागी उन्मुक्त चंदला, तर विनयकुमार याच्या जागी मॅकक्लीनगला संधी देण्यात आली. यामध्ये उन्मुक्तने संधीचे सोने केले. त्याने ३७ चेंडंूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावा चोपल्या. त्या मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. त्याआधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आरसीबी संघात डॅरेन सॅमी, सीन अ‍ॅबोट, मनदीप सिंह यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी इक्बाल अब्दुल्ला, डेव्हिड विजे, रिली रोसो आणि मनविंदर बिस्ला यांना संधी मिळाली. मुंबईने शानदार सुरुवात केली. सिमन्स आणि पार्थिव पटेलने डावाची सुरुवात केली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. पार्थिव १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर सिमन्स आणि चंदने संघाला शतकापर्यंत नेले. यामध्ये सिमन्सने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४४ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकार ठोकत ५९ धावा केल्या. चाहलाच्या चेंडूवर अ‍ॅरोनकरवी तो झेलबाद झाला. एका बाजूने शानदार फटकेबाजी करणाऱ्या उन्मुक्तने रोहित शर्मासोबत ६३ धावांची भागीदारी केली. रोहितने अवघ्या १५ चेंडूंत ४२ धावा चोपल्या. यात त्याच्या ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. पोलार्डने ५ धावांचे योगदान दिले.