सरीता देवीवरील एक वर्षाची बंदी मागे घेण्याची क्रीडा मंत्रालयाची विनंती

By Admin | Updated: December 17, 2014 14:23 IST2014-12-17T13:02:24+5:302014-12-17T14:23:12+5:30

दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणा-या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेने एका वर्षाची बंदी घातली आहे.

Ministry of Sports requesting withdrawal of one-year ban on Sarita Devi | सरीता देवीवरील एक वर्षाची बंदी मागे घेण्याची क्रीडा मंत्रालयाची विनंती

सरीता देवीवरील एक वर्षाची बंदी मागे घेण्याची क्रीडा मंत्रालयाची विनंती

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १७ - दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देणा-या बॉक्सर सरिता देवीवर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेने (एआयबीए) एका वर्षाची बंदी घातली आहे. क्रीडा मंत्रालयाने एआयबीए ला पत्र लिहिले असून सरीतादेवीवरील बंदी मागे घ्यावी अशी विनंती केली आहे. भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक बी. आय. फर्नांडिझ यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 
आशियाई स्पर्धेदरम्यान उपांत्य फेरीत सरिता देवीने दक्षिण कोरियाच्या पार्क जिनावर वर्चस्व गाजवलेले असतानाही पंचानी सरिता देवीविरोधात निकाल दिला. या निर्णयाच्या निषेधार्थ सरित देवीने कांस्य पदक स्वीकारण्यास नकार दिला. तिच्या या कृतीची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेने गंभीर दखल घेत तिला अनिश्चित काळासाठी निलंबित केले होते. नंतर सरिता देवीने या प्रकरणी माफीही मागितली होती.  मात्र आज तिच्यावर एक वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय असोसिएशनने जाहीर केला. या बंदीनंतर सरिता देवी हिला आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संस्थेचा अंतर्गत होणा-या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. दरम्यान सरीतादेवीने ब्रॉन्झ पदक स्वीकारले आहे. काहीवेळा भावनेच्या भरात सरीतादेवीने केली तशी चूच होते, तरी तिच्यावर कठोर कारवाई करू नये अशी मागणी भारतातल्या अनेक खेळाजुंनी यापूर्वी केली होती. तरीही आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संस्थेने एक वर्षाची बंदी घातली असून आता भारत सरकार तिच्यासाठी रदबदली करताना दिसत आहे.

Web Title: Ministry of Sports requesting withdrawal of one-year ban on Sarita Devi