मिनी ऑलिम्पिक

By Admin | Updated: July 12, 2014 22:06 IST2014-07-12T22:06:30+5:302014-07-12T22:06:30+5:30

औरंगाबादेत रंगणार मिनी ऑलिम्पिक स्पर्धा

Mini Olympics | मिनी ऑलिम्पिक

मिनी ऑलिम्पिक

ंगाबादेत रंगणार मिनी ऑलिम्पिक स्पर्धा
चार कोटींची तरतूद : ३२ खेळांचा समावेश
मुंबई : स्पर्धेत खेळण्याची खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी आणि विविध क्रीडा प्रकारांसाठी पोषक वातावरण तयार व्हावे, या उद्देशाने राज्यात मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. औरंगाबादलाही स्पर्धा आयोजनचा मान मिळणार आहे़
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि अमरावती या सर्व सात विभागात मिनी ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्यात येणार असून, त्यासाठी ४.६ कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहेत. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. मिनी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एकूण ३२ खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धांचा उद्घाटन तसेच समारोप सोहळा पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्याच्या उद्देशाने उच्चस्तर, मुख्य स्पर्धा आणि विभागीय स्पर्धा आयोजन समित्याही स्थापन करण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mini Olympics