शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

केविनच्या जोरावर एमआयजी विजयी

By admin | Updated: November 7, 2016 05:51 IST

केविन डी’अल्मेडाच्या शानदार नाबाद १४२ धावांच्या जोरावर बलाढ्य एमआयजी क्रिकेट क्लब संघाने तुल्यबळ डॉ. डीवाय पाटील एसए संघाचा ६९व्या पोलीस शिल्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात ५ विकेट्सने पराभव केला.

मुंबई : केविन डी’अल्मेडाच्या शानदार नाबाद १४२ धावांच्या जोरावर बलाढ्य एमआयजी क्रिकेट क्लब संघाने तुल्यबळ डॉ. डीवाय पाटील एसए संघाचा ६९व्या पोलीस शिल्ड स्पर्धेच्या ‘अ’ गटात ५ विकेट्सने पराभव केला. वांद्रे येथील एमआजी मैदानावर झालेल्या या दोनदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डीवाय पाटील संघाने ७० षटकात ८ बाद ३१८ धावा काढल्या. सर्वेश दामले याने १५३ चेंडूत १७ चौकार व एका षटकारासह १२७ धावांची खेळी केली. तसेच, जे. सिंग (९०), योगेश ताकवले (३६*) यांनीही उपयुक्त खेळी करताना संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. प्रतीक दाभोळकरने (३/५७) अचूक मारा करुन डीवाय पाटील संघाच्या धावसंख्येला वेसण घातली.यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या एमआयजी संघाने आक्रमक खेळी केली. केविनने १३१ चेंडू खेळताना १३ चौकार व २ उत्तुंग षटकार खेचताना शानदार १४२ धावांची नाबाद खेळी केली. संदीप कुंचिकोरने देखील ७४ धावा काढून त्याला चांगली साथ दिली. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर एमआयजीने ६७.१ षटकातच विजय निश्चित करताना ५ फलंदाजांच्या मोबदल्यात ३१९ धावा फटकावल्या. दुसरीकडे, ‘ब’ गटामध्ये पय्याडे स्पोटर््स क्लबला कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनविरुध्द ३ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना पय्याडेचा डाव ६७.२ षटकात २५१ धावांत संपुष्टात आला. विद्याधर कामत (५/६०) आणि शिवम दुबे (४/४५) यांच्यापुढे पय्याडेची दाणादाण उडाली. प्रसाद पवारने (७०) पय्याडेकडून एकाकी झुंज दिली. यानंतर, कर्नाटक स्पोर्टिंगने अनुप रेवंडकर (५४), शुभम दुबे (४४) यांच्या जोरावर ५१.२ षटकात ७ बाद २५२ धावा काढून बाजी मारली. एकवेळ पय्याडेने अचूक मारा करुन कर्नाटक स्पोर्टिंगला अडचणीत आणले होते. मात्र, अनुप व शुभम यांनी संयमी खेळी करुन सांघाला सावरले. प्रदीप साहू याने ८१ धावांत अर्धा संघ बाद करुन पय्याडेच्या आशा उंचावल्या होत्या. (क्रीडा प्रतिनिधी)