शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सी @ ५००

By admin | Updated: November 8, 2016 03:41 IST

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेज यांनी केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर स्पॅनिश चॅम्पियन बार्सिलोना एफसीने ला लीगा स्पर्धेत सेविलाविरुद्ध २-१ असा विजय मिळविला

माद्रिद : अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी आणि लुईस सुआरेज यांनी केलेल्या शानदार खेळाच्या जोरावर स्पॅनिश चॅम्पियन बार्सिलोना एफसीने ला लीगा स्पर्धेत सेविलाविरुद्ध २-१ असा विजय मिळविला. यासोबतच मेस्सीने बार्सिलोनासाठी आपले ५०० गोल देखील पूर्ण केले. विशेष म्हणजे, मेस्सी व सुआरेज यांच्यामुळे गेल्या सहा दिवसांतील दुसरा पराभव टाळण्यात बार्सिलोनाला यश आले.या विजयानंतर बार्सिलोनाने रेयाल माद्रिदमधील अंतर दोन गुणांनी कमी केले. चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोनाला मँचेस्टर सिटीविरुद्ध १-३ असा मोठा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, सेविलाविरुद्ध बार्सिलोनाच्या दिग्गज खेळाडूंनी आपला हिसका दाखविताना दमदार विजय नोंदविला. दरम्यान, सामन्याच्या पहिल्या सत्रात सेविलाने वर्चस्व राखत बार्सिलोनाला दबावाखाली ठेवले होते. आक्रमक सुरुवात केलेल्या सेविलाने पहिल्या ५० सेकंदांमध्येच गोल करण्याच्या दोन संधी निर्माण केल्या. तर, यानंतर सुआरेज व नेमार यांनी सेविलाचे बचाव भेदण्यात यश मिळवले. मात्र, सर्जियो रिको याने दोघांचे आक्रमण रोखले.पहिल्या सत्रात केलेल्या आक्रमक खेळाचा फायदा सेविलाला झाला आणि १५व्या मिनिटाला पाब्लो सारबियाने दिलेल्या उत्कृष्ट पास सर्जी रॉबर्टोने विटोलोकडे दिला आणि त्यावर विटोलोने शानदार गोल करून संघाला १-० असे आघाडीवर नेले.यानंतर, मात्र बार्सिलोनाने आपला वेगवान खेळ करताना मेस्सी आणि सुआरेज यांच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटले. मध्यांतराच्या दोन मिनिटआधी मेस्सीने नेमारच्या कॉर्नर पासवर चेंडूला गोलजाळ्याची दिशा देत संघाला बरोबरी साधून दिली. आपल्या संघासाठी मेस्सीने केलेला हा ५०० वा गोल ठरला. मध्यंतरानंतर, बार्सिलोनाने आपला धडाका कायम राखला. यावेळी सुआरेजने सूत्रे आपल्याकडे घेताना मेस्सीकडून मिळालेल्या पासवर रिकोला चकमा देत बार्सिलोनाचा विजयी गोल साकारला. यानंतर, पुन्हा एकदा सुआरेजने गोल करण्याची सुवर्ण संधी निर्माण केली. परंतु, रिकोने त्याला रोखले आणि अखेरपर्यंत आघाडी कायम राखत बार्सिलोनाने बाजी मारली.