शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांमध्ये रंगणार विजेतेपदाची लढत

By admin | Updated: December 14, 2015 02:43 IST

मुंबई शहरच्या शिवशक्ती आणि उपनगरच्या महात्मा गांधी या बलाढ्य संघांनी आपापल्या उपांत्य सामन्यात बाजी मारताना पुणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या

पुणे : मुंबई शहरच्या शिवशक्ती आणि उपनगरच्या महात्मा गांधी या बलाढ्य संघांनी आपापल्या उपांत्य सामन्यात बाजी मारताना पुणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिला गटात अंतिम फेरी गाठली. त्याचवेळी ठाण्याच्या शिवशंकरने पुरुषांची अंतिम फेरी गाठली असून, मुंबईच्या विजय क्लबचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.खराडी येथील वि. मा. पठारे बंदिस्त मैदानात मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांमध्ये मुंबईकरांचे वर्चस्व राहिले. मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या वाघेश्वर संघाचा २६-०६ असा फडशा पाडत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला शिवशक्तीने १८-३ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. अपेक्षा टाकळे व रेखा सावंत यांनी खोलवर चढाई करून पुणेकरांना जेरीस आणले. अन्य सामन्यात मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी संघाने पुण्याच्या सुवर्णयुग संघाचे आव्हान १०-५ असे परतावले. पहिल्या सत्रात महात्मा गांधी संघाने ६-३ अशी आघाडी घेतली होती. मीनल जाधवने दमदार खेळ करून संघाला अंतिम फेरीत नेले. सुवर्णयुगच्या सुमती पुजारी व सोनाली इंगळे यांनी अपयशी झुंज दिली.पुरुष गटात ठाण्याच्या शिवशंकरने अंतिम फेरी गाठताना चिपळूणच्या न्यू हिंद विजय संघाचा २३-९ असा धुव्वा उडवला. सुरुवातीला सावध खेळ करताना शिवशंकरने ५-३ अशी आघाडी घेतली होती. यानंतर मात्र त्यांनी तुफान आक्रमण करताना सामना एकतर्फी ठरवला. तर मुंबईच्या विजय क्लबला उपांत्य सामन्यात पुण्याच्या साई स्पोटर््स अ‍ॅकॅडमीविरुद्ध २३-३७ असा पराभव पत्करावा लागला. (क्रीडा प्रतिनिधी)