पाकसोबतच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत दुजाभाव, विराटने सोडले मैदान

By Admin | Updated: June 1, 2017 19:31 IST2017-06-01T19:31:57+5:302017-06-01T19:31:57+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफीतील चार तारखेला होणाऱ्या हायव्होलटेज सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत दुजाभाव केला जात असल्याचं समोर आलं आहे

Before the match against Pak, there was a lot of confusion with the Indian team, Virat left the field | पाकसोबतच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत दुजाभाव, विराटने सोडले मैदान

पाकसोबतच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत दुजाभाव, विराटने सोडले मैदान

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 1 - चॅम्पियन्स ट्रॉफीतील चार तारखेला होणाऱ्या हायव्होलटेज सामन्यापूर्वी भारतीय संघासोबत दुजाभाव केला जात असल्याचं समोर आलं आहे. भारतीय संघाला सरावासाठी पुरेशी जागा दिली जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच. सरावासाठी आवश्यक सुविधा न दिल्याने भारतीय संघाच्या संघ व्यवस्थपकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर वैतागलेल्या कर्णधार विराट कोहलीने मैदान सोडून दुसऱ्या जागेची चाचपणी केली.
भारतीय संघाला सरवासाठी मुख्य खेळपट्टीच्या बाजूला जागा देण्यात आली. मात्र या जागेत संपूर्ण संघाला सराव करणं शक्य नाही. ती जागा खूपच अपुरी आहे. भारतीय संघाला जी सुविधा पुरवण्यात आली आहे, त्यापेक्षा चांगली सुविधा कॉलेज स्पर्धांसाठी पुरवली जाते असं बर्मिंगहॅममधील चित्र असल्याचे समोर आले आहे. काल याच ठिकाणी पाकिस्तानी संघाला मात्र मोठी आणि भारदस्त जागा देण्यात आली होती.

भारतीय संघाचे मॅनेजर कपिल मल्होत्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबतच विचारणा केली आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सरावाच्या मैदानाजवळ माध्यमांला येण्यास मनाई केली आहे. संघाचा प्लॅन लीक होऊ नये त्यासाठी ही उपाययोजना असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सरावासाठी मैदान लहान असल्यामुळे बाहेरुन येणाऱ्यांना दुखापत होऊ शकते, असंही कारण दिलं जात आहे.

Web Title: Before the match against Pak, there was a lot of confusion with the Indian team, Virat left the field