मन्सुरी, साहिल शाह यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By Admin | Updated: January 19, 2017 00:49 IST2017-01-19T00:49:50+5:302017-01-19T00:49:50+5:30

युवा भारतीय बॉक्सर्सनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत येथे सुरू असलेल्या पुरुष तसेच महिला युवा बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Mansuri, Sahil Shah clash in quarter-finals | मन्सुरी, साहिल शाह यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

मन्सुरी, साहिल शाह यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक


नवी दिल्ली : युवा भारतीय बॉक्सर्सनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत येथे सुरू असलेल्या पुरुष तसेच महिला युवा बॉक्सिंग स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
लाईट फ्लायवेट(४६-४९) गटात प. बंगालचा मोहम्मद इकरामल मन्सुरी, हिमाचल प्रदेशचा साहिल शाह, चंदीगडचा अंशुल पुनिया, छत्तीसगडचा पंकज कुमार, झारखंडचा सूरज सोय, पंजाबचा शुभम आणि उत्तराखंडचा सूरजसिंग माजिला यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
फ्लायवेट (५२) प्रकारात राजस्थानचा शिवदयाल व एसएससीबीचा चौधरी विल्सनसिंग यांनी अनुक्रमे बी. राहुल आणि केके गोविंद यांना ५-० ने पराभूत केले. वेल्टरवेट (६९) गटात दिल्लीचा अभिलाश याने दिनेश यादव याच्यावर ५-० ने विजय मिळविला. जम्मू कश्मीरचा विशालसिंग व पंजाबचा अर्शदीप यांना पुढे चाल मिळाली. मिडलवेट (७५) गटात तामिळनाडूचा केपी कंधाप्रकाश, राजस्थानचा के. आदिया लांबा, महाराष्ट्राचा रूपिन, एसएससीबीचा सचिन व दिल्लीचा गौरव डबास यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली. (वृत्तसंस्था)

Web Title: Mansuri, Sahil Shah clash in quarter-finals