शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

मनोहर यांचा राजीनामा

By admin | Updated: May 11, 2016 02:39 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जस्टिस लोढा समितीतर्फे बोर्डाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची शिफारस केली

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जस्टिस लोढा समितीतर्फे बोर्डाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची शिफारस केली असून त्याविरोधात बीसीसीआय न्यायालयात कायदेशीर लढाईला सामोरे जात असताना मनोहर यांनी राजीनामा दिला आहे, हे विशेष. मनोहर यांनी आॅक्टोबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून हा त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. मनोहर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) चेअरमनही आहेत. या महिन्यानंतर आयसीसीला आपल्या नव्या चेअरमनची निवड करायची असताना मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आयसीसीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात जाहीर केले होते, की चेअरमन स्वतंत्र राहणार असून तो आपल्या देशाच्या बोर्डात कुठल्याही पदावर राहणार नाही. मनोहर यांनी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा देत असून याचसोबत मी आयसीसीमध्येही बीसीसीआयचा प्रतिनिधी म्हणून राजीनामा देत आहे. याव्यतिरिक्त मी आशियाई क्रिकेट परिषदेचे पदही सोडत आहे. बीसीसीआयच्या आमसभेने मला आशियाई क्रिकेट परिषदेवर नियुक्त केले होते.’’बीसीसीआयचे सचिव ठाकूर यांनी याबाबत बोलताना सांगितले, ‘‘आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी स्वतंत्र सदस्य असणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.’’दरम्यान, बीसीसीआयच्या घटनेनुसार अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील कारवाईसाठी सचिवाने दोन आठवड्यांच्या आत नोटीस देत विशेष आमसभा बोलाविणे गरजेचे आहे. त्यानंतर भविष्याबाबत निर्णय घेणे सोयीचे होते.’’ आयीसीसीने केलेल्या शिफारशीनुसार ५८ वर्षीय मनोहर कुठल्याही क्रिकेट बोर्डाचे प्रतिनिधी राहणार नाहीत. याव्यतिरिक्त आयसीसी बोर्डाच्या दोन स्वतंत्र सदस्यांना त्यांच्या नावांची शिफारस करावी लागेल. बीसीसीआयच्या सूत्रानुसार मनोहर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करीत होते, पण न्यायालयाचा निकाल उन्हाळी सुट्यानंतर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या या वकिलाने अधिक प्रतीक्षा करण्याचे टाळले. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ प्रशासकाने सांगितले, ‘‘शशांक मनोहर बीसीसीआयच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचा आम्हाला सर्वांना अंदाज होता. बीसीसीआय अडचणीच्या स्थितीत असताना, हा त्यांचा निर्णय योग्य किंवा अयोग्य, या वादात मला रस नाही.’’ बीसीसीआयच्या जास्तीत जास्त सदस्यांना आशा होती, की मनोहर सप्टेंबर २०१७ पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत बोर्डाची प्रतिमा सुधारण्याची प्रक्रिया सुरू ठेवतील, पण त्यांनी आयसीसीचे पद सांभाळण्यास स्वारस्य दाखविल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले.’’ (वृत्तसंस्था)> पवार, ठाकूर, शुक्ला, शिर्के अध्यक्षपदाच्या शर्यतीतभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, राजीव शुक्ला व अजय शिर्के यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर हेदेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्याशिवाय राजीव शुक्लादेखील या पदाच्या शर्यतीत आहेत. दुसरीकडे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष तथा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील पुन्हा बीसीसीआय प्रमुखपदी विराजमान होऊ शकतात. अथवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांचे नाव अखेरच्या क्षणी पुढे येऊ शकते. शिर्के हे पवार यांचे समर्थक मानले जातात. त्यांचे घरोब्याचे संबंध असल्याने पवार देखील त्यांच्यासाठी रणनीती आखू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.मात्र, नियमानुसार बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा पंधरा दिवसांत बोलवणे आवश्यक आहे. मात्र अशी सभा बोलावण्याचा अधिकार सचिव या नात्याने ठाकूर यांना आहे.