शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसाठी ‘करा किंवा मरा’

By admin | Updated: May 21, 2016 12:33 IST

गुजरात लॉयन्स संघ ग्रीनपार्कच्या परिस्थितीचा लाभ घेत आज शनिवारी मुंबई इंडियन्सवर विजयासह पहिल्या दोन संघात स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने उतरणार

कानपूर : कोलकाता नाईट रायडर्सला नमवित प्ले आॅफच्या जवळ पोहोचलेला गुजरात लॉयन्स संघ ग्रीनपार्कच्या परिस्थितीचा लाभ घेत आज शनिवारी मुंबई इंडियन्सवर विजयासह पहिल्या दोन संघात स्थान निश्चित करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. दुसरीकडे मुंबईसाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा असेल. विजयामुळे प्ले आॅफच्या आशा जिवंत राहतील .केकेआरवरील सहा गड्यांनी मिळविलेल्या विजयामुळे गुजरातच्या अंतिम चार संघात स्थान मिळविण्याची आशा पल्लवित झाली. गुजरातचे १३ सामन्यात ८ विजयासह १६ गुण असून हैदराबादपाठोपाठ हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. गुजरातचा आजचा विजय म्हणजे पहिल्या दोन संघात स्थाननिश्चिती असा असेल. पराभूत झाल्यास मात्र परिस्थिती नाजूक होईल. या संघाची धावसरासरी खराब आहे. मुंबईला विजय मिळाला तरच प्ले आॅफची आशा बाळगता येईल. १३ सामन्यात सात विजयासह संघाचे १४ गुण असून धावसरासरी उणे ०८२ इतकी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबईला अंतिम चार संघात स्थान पटकवायचे झाल्यास हा सामना जिंकावाच लागेल.

गुजरात लॉयन्सने ग्रीनपार्कची स्थिती ओळखली आहे. त्यांच्या गोलंदाजांनी केकेआरविरुद्ध विजय सोपा केला.मुंबई संघ येथे दाखल झाला. भीषण उकाड्याचा सामना मुंबईचे खेळाडू कसा करतील यावर सामन्यात प्रभावी कामगिरी विसंबून राहील. याआधी दिल्लीवर मोठ्या विजयामुळे मुंबई संघात उत्साह आहे. कृणाल पांड्या याने फलंदाजी आणि गोलंदाजीत चुणूक दाखविली होती. मार्टिन गुप्तिल, किरोन पोलार्ड, जोस बटलर, अंबाती रायुडू हे चांगले फलंदाज तसेच मिशेल मॅक्लेनगन, जसप्रित बुमराह आणि अनुभवी हरभजनसिंगसारखे गुणी फलंदाज आहेत. मुंबई संघाची जादू चालल्यास कुणालाही पराभूत करण्याची ताकद या संघात आहे. (वृत्तसंस्था)>उभय संघयातून निवडणारमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लेनघन, अक्षय वाखारे, नितीश राणा,हार्दिक पंड्या, जगदीश सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या, मार्टिन गुप्टिल व जितेश शर्मा.गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉल्कनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.