शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

गृहमैदानावर विजयी शेवट करण्यास लायन्स उत्सुक

By admin | Updated: May 3, 2016 04:46 IST

गेल्या लढतीत गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला तरी गुणतालिकेतअव्वल स्थानावर असलेला गुजरात लायन्स संघ

राजकोट : गेल्या लढतीत गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला तरी गुणतालिकेतअव्वल स्थानावर असलेला गुजरात लायन्स संघ गृहमैदानावर मंगळवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजयाने शेवट करण्यास उत्सुक आहे. रविवारी पंजाबविरुद्ध २३ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यामुळे लायन्स संघाची सलग तीन विजयांची मालिका खंडित झाली. या पराभवानंतरही लायन्स संघाच्या खात्यावर ८ सामन्यांत १२ गुणांची नोंद असून गुणतालिकेत हा संघ अव्वल स्थानावर अहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता दिल्ली संघाची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे. सहा सामन्यांत चार विजयांसह ८ गुणांची कमाई करणारा हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. गुजरात लायन्स संघाची फलंदाजीची भिस्त आक्रमक सलामीवीर ब्रॅन्डन मॅक्युलम व ड्वेन स्मिथ यांच्यावर आहे. या दोघांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्या वेळी लायन्स संघ २०० धावांच्या आसपासचे लक्ष्यही गाठण्यात यशस्वी ठरला आहे. मॅक्युलम व स्मिथ रविवारी पंजाबविरुद्धच्या लढतीत अपयशी ठरले. लायन्स संघाला मंगळवारी दिल्ली संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत या दोघांकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. कर्णधार सुरेश रैना व दिनेश कार्तिक यांनी मधल्या फळीत उपयुक्त योगदान दिले आहे, पण अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो व रवींद्र जडेजा यांचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. ब्राव्हो व जडेजा यांनी गोलंदाजीमध्ये छाप सोडली, पण फलंदाजीमध्ये ते अपयशी ठरले आहेत. गोलंदाजीची चर्चा करता प्रवीणकुमार व धवल कुलकर्णी या जोडीने सुरुवातीपासून आपली जबाबदारी सांभाळली आहे, तर डावखुरा चायनामन गोलंदाज शिविल कौशिकने पंजाबविरुद्ध ४ षटकांत २० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत छाप सोडली. दिल्ली संघ लायन्सविरुद्ध गृहमैदानावर १ धावेने पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास प्रयत्नशील आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि झहीर खानच्या नेतृत्वात खेळत असलेल्या डेअरडेव्हिल्स संघाने गेल्या मोसमापेक्षा यंदाच्या मोसमात शानदार कामगिरी केली आहे. संघाने सहापैकी चार सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांना केवळ गुजरात लायन्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. मोसमातील पहिले शतक झळकावणाऱ्या क्विंटन डी कॉकला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही, तर दुसरा सलामीवीर श्रेयस अय्यरला अद्याप सूर गवसलेला नाही. युवा करुण नायर, संजू सॅमसन व दक्षिण आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी यांनी काही उपयुक्त खेळी केल्या आहेत. गेल्या लढतीत युवा सॅम बिलिंग्सने यंदाच्या मोसमात संघातर्फे पहिली लढत खेळताना ३४ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी केली. अंतिम ११ खेळाडूंत पुनरागमन करणारा विंडीजचा कार्लोस ब्रेथवेटने गेल्या लढतीत केकेआरविरुद्ध ११ चेंडूंमध्ये ३४ धावा फटकावल्या होत्या. अष्टपैलू ख्रिस मॉरिसनेही छाप सोडली आहे. त्याने लायन्सविरुद्ध यापूर्वीच्या लढतीत ३२ चेंडूंमध्ये नाबाद ८२ धावा ठोकल्या होत्या. संघाची गोलंदाजीची बाजू चांगली आहे. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारगुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), अ‍ॅरॉन फिंच, ब्रॅन्डन मॅक्युलम, ड्वेन ब्राव्हो, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, अक्षदीप नाथ, जेम्स फॉल्कनर, प्रवीणकुमार, शादाब जकाती, प्रवीण तांबे, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, शिवील कौशिक, धवल कुलकर्णी, सरबजित लड्डा, अमित मिश्रा, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन आणि अ‍ॅण्ड्र्यू टाय.दिल्ली डेअरडेविल्स : झहीर खान (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जेपी ड्युमिनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, कार्लोस बे्रथवेट, करुण नायर, पवन नेगी, ऋषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयाल, जयंत यादव, ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, नॅथन कोल्टर नाइल, इम्रान ताहिर, महिपाल लोमरोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, खलील अहमद, अखिल हेरवाडकर आणि प्रत्युष सिंग.