योग्य वेळी घोषणा करू : ठाकूर

By Admin | Updated: June 3, 2015 00:42 IST2015-06-03T00:42:17+5:302015-06-03T00:42:17+5:30

भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या बीसीसीआयमधील भूमिकेबाबत आजही स्थिती अस्पष्ट होती. जेव्हा सचिव अनुराग ठाकूर यांनी योग्य वेळ आल्यानंतर

Let's announce at the right time: Thakur | योग्य वेळी घोषणा करू : ठाकूर

योग्य वेळी घोषणा करू : ठाकूर

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या बीसीसीआयमधील भूमिकेबाबत आजही स्थिती अस्पष्ट होती. जेव्हा सचिव अनुराग ठाकूर यांनी योग्य वेळ आल्यानंतर घोषणा केली जाईल, असे सांगितले. बीसीसीआयने नवनियुक्त सल्लागार समिती जाहीर केली. त्यात द्रविडचा समावेश नाही. यासंदर्भात, ठाकूर म्हणाले, द्रविडसारख्या अनुभवी खेळाडूकडून बीसीसीआयची सेवा होणे अपेक्षित आहे. वेळ आल्यानंतर याबाबत घोषणा केली जाईल. सर्वांनाच एका पॅनेलमध्ये समाविष्ट केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. क्रिकेटच्या विकासासाठी या अनुभवी खेळाडूंच्या सेवेची गरज आहे.
सल्लागार समितीत सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांचा समावेश आहे. हे पॅनेल भारतीय क्रिकेटच्या विकासासाठी ‘प्रगतशील’ पावले उचलील. त्यामुळे बोर्ड आणि राष्ट्रीय क्रिकेट संघाला मोलाचे मार्गदर्शन मिळेल. एवढेच नव्हे, तर डंकन फ्लेचर यांच्या जागी नव्या प्रशिक्षकासाठीही त्यांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
(वृत्तसंस्था)

Web Title: Let's announce at the right time: Thakur