शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

गेल फेअरफॅक्सविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार

By admin | Updated: January 8, 2016 03:31 IST

गेल्या वर्षी वर्ल्डकपदरम्यान एका महिलेसोबत केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपात गुंतलेला वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने फेअरफॅक्स मीडियाविरुद्ध प्रतिमा मलिन करण्याचा आरोप लावला आहे

मेलबोर्न : गेल्या वर्षी वर्ल्डकपदरम्यान एका महिलेसोबत केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपात गुंतलेला वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने फेअरफॅक्स मीडियाविरुद्ध प्रतिमा मलिन करण्याचा आरोप लावला आहे आणि आता याविषयी त्याने या मीडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.आॅस्ट्रेलियन पत्रकाराविषयी असभ्य मत व्यक्त करण्याच्या वादामुळे माफी मागून शिक्षेपासून वाचलेल्या गेलने त्याच्यावर करण्यात आलेल्या विनयभंगाच्या त्याच्यावरील दुसऱ्या आरोपाचे खंडन केले आहे. गेलचे एजंट सायमन ओटोरी यांनी म्हटले, ‘‘ख्रिसने फेअरफॅक्सद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आरोपाचे खंडन केले आहे. ख्रिसने आरोपाचे वारंवार खंडन केल्यानंतरही फेअरफॅक्सने या प्रकरणाला जास्त महत्त्व दिले. त्यामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. आम्ही फेअरफॅक्सविरुद्ध अबु्रनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. ख्रिसविरुद्ध चुकीचे आरोप केल्यामुळे ख्रिस आणि त्याचे मॅनेजमेंट कायदेशीर कारवाई करू शकतात आणि त्यासाठी आॅस्ट्रेलियातील एक आघाडीचे वकील मार्क ओ ब्रायन यांनादेखील नियुक्त करण्यात आले आहे.’’उल्लेखनीय बाब म्हणजे, वर्ल्डकपदरम्यान विंडीज संघाशी निगडित आॅस्ट्रेलियन महिलेने फेअरफॅक्स मीडियाशी बोलताना गेलवर विनयभंगाचा आरोप केला होता. याआधी ३६ वर्षीय गेलवर बिग बॅश लीगमध्ये एका महिला टीव्ही पत्रकार मॅक्लॉगलनशी खराब वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध १० हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. तथापि, या प्रकरणानंनतर गेलने माफीही मागितली होती.