शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

कबड्डी : सिद्धीप्रभा,जय दत्तगुरु, अमरहिंद यांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 8:18 PM

सिद्धेश राऊतचा एकाच चढाईत ७गडी राखण्याचा पराक्रम

मुंबई : सिद्धीप्रभा, जय दत्तगुरु, अमरहिंद, दुर्गामाता यांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित "मनसे चषक" कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी उद्यानातील मैदानावर आज पासून सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात प्रभादेवीच्या सिद्धीप्रभाने अशोक मंडळाने भवानीमाताचा ४४-२४असा पाडाव करीत विजयी सलामी दिली. पहिल्या पाच मिनिटात लोण देत सिद्धीप्रभाने १०-०१अशी आघाडी घेत आम्हीच विजयी होणार हेच जणू सिद्ध केले. विश्रांतीला २६-१५अशी त्यांच्याकडे आघाडी होती. ओमकार ढवळ, विवेक मोरे यांच्या शानदार चढाई-पकडीच्या खेळामुळे सिद्धीप्रभाने हा सामना सहज आपल्या खिशात टाकला. अशोक मंडळाच्या ओमकार चव्हाण, शुभम बावणे यांनी १५व्या मिनिटाला लोणची परतफेड करीत सामन्यात रंगत आणली. पण नंतर मात्र सामना एकतर्फी झाला.

      दुसऱ्या सामन्यात जय दत्तगुरुने भवानीमाताला ३६-२३असे नमवित आगेकूच केली.अत्यंत चुरशीनें खेळल्या गेलेल्या या सामन्यात दत्तगुरुने सुरुवातच अशी आक्रमक केली की, भवानीमातावर पहिला लोण देत ९-०अशी आघाडी घेतली.पण त्यांचा हा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण त्या लोणची परतफेड करीत भवानीमाताने १३-१४अशी आघाडी कमी केली. विश्रांतीला दोन्ही संघ १५-१५असे बरोबरीत होते. ही कोंडी दत्तगुरूंच्या मोनुने फोडली.त्यांने चढाईत सलग दोन गुण घेत संघाला आघाडी मिळवून दिली. मोनू कांदू, आकाश उपाध्याय दत्तगुरु कडून, तर अनिकेत मंडव, सिद्धेश परब, यश कवठकर भवानीमाताकडून उत्तम खेळले. अ

मरहिंदने ओम साईनाथ ट्रस्टचा ४०-१८असा पराभव केला. तिसऱ्या मिनिटाला लोण देत अमरहिंदने ९-०अशी आघाडी घेतली.पण साईनाथच्या सिद्धेश राऊतने आपल्या पुढच्याच चढाईत ७गडी टिपत लोणची परतफेड करीत ९-९अशी बरोबरी केली.  कुमार खेळाडूने एका चढाईत ७गडी टिपण्याचा पराक्रम बहुदा हा पहिल्यांदाच घडला असावा. विजय नवनाथच्या सागर कुऱ्हाडेने प्रौढ गटात असा विक्रम केला होता. ओमकार पाटील, नंदिश बर्डे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.  शेवटच्या सामन्यात दुर्गामाताने न्यू राष्ट्रीयचा ३१-०५असा धुव्वा उडविला. त्यांच्या या विक्रमी विजयाचे श्रेय प्रथमेश पालांडे,करणं कदम, अमित बिस्त यांच्या जोरकस खेळाला जाते.न्यू राष्ट्रीयचा विक्रात खापणे बरा खेळला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई