शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

जितू रायला रौप्य

By admin | Updated: June 26, 2016 01:58 IST

भारतीय नेमबाज जितू रायने आयएसएसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेत शनिवारी चमकदार कामगिरी करताना पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. जितूकडून

बाकू : भारतीय नेमबाज जितू रायने आयएसएसएफ विश्वकप नेमबाजी स्पर्धेत शनिवारी चमकदार कामगिरी करताना पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. जितूकडून भारताला रिओ आॅलिम्पिकमध्ये पदकाची आशा आहे. जितूला शुक्रवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते; पण त्याने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. थोड्या फरकाने त्याचे सुवर्णपदक हुकले. रिओ आॅलिम्पिकचा यजमान देश असलेल्या ब्राझीलच्या फेलिप अल्मिदा वूने सुवर्णपदक पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे दुसरे सुवर्ण आहे. फेलिपने बँकॉकमध्ये मोसमातील पहिल्या टप्प्याच्या स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. ब्राझीलच्या या २४ वर्षीय नेमबाजाने फायनलमध्ये २००.० असा स्कोअर नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर २८ वर्षीय जितूने १९९.५ गुणांसह रौप्यपदकाचा मान मिळवला. तीनदा आॅलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या कोरियाच्या जिन जोंगोहला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. जिनने ५० मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. सध्याच्या विश्वकप स्पर्धेत भारताचे हे पहिलेच पदक आहे. भारताला चौथ्या दिवशी पदकाचे खाते उघडता आले. (वृत्तसंस्था) जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला नेमबाज जितूने फायनलमध्ये अखेरच्या मालिकेत चमकदार कामगिरी करीत रौप्य पटकावले. जितूने पहिल्या मालिकेत ३०.५, दुसऱ्या मालिकेत ३०.२ चा स्कोअर नोंदवला होता. त्याने एलिमिनेशन पदक राऊंडमध्ये अखेरच्या दोन शॉटवर अनुक्रमे १०.२ व १०.६ असा शानदार स्कोअर नोंदवला. एलिमिनेशनमध्ये जितू याने १३८.८ गुणांची नोंद केली.