शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावचा दक्ष जाधव याचे शानदार वर्चस्व

By admin | Updated: June 15, 2016 03:52 IST

राज्यस्तरीय टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत जळगावच्या दक्ष जाधव याने मिडल जेट गटांत पुण्याच्या नील मुळ््ये याचा पराभव केला. तर ग्लोरिया जॉर्ज, संपदा भिवंडकर,

पनवेल : राज्यस्तरीय टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत जळगावच्या दक्ष जाधव याने मिडल जेट गटांत पुण्याच्या नील मुळ््ये याचा पराभव केला. तर ग्लोरिया जॉर्ज, संपदा भिवंडकर, मैनाक निस्टाला, मिहीका रोहिरा, दिपीत पाटील यांनी आपआपल्या गटात अव्वल स्थान पटकावले .मंगळवारी उल्वे येथील रामशेट ठाकूर स्पोर्टस् कॉम्पलेक्स येथे झालेल्या स्पर्धेत दक्ष जाधवने मिडलजेट मुलांच्या गटांतील अंतिम सामन्यात नील मुळ््येवर ११-४,११-५,७-११, ११-७ असा पराभव केला. या गटात अव्वल मानांकित दक्ष जाधव हाच संभाव्य विजेता होता. गेल्या अठवड्यात पुणे येथे झालेल्या स्पर्धेतही दक्षने याच गटात विजेतेपद पटकावले होते. दक्षने सलग दोन गेम जिंकल्यावर तिसऱ्या गेममध्ये नीलने कडवा प्रतिकार केला. हा गेम त्याने ७ -११ असा जिंकला अखेरच्या गेममध्ये पुन्हा दक्षचीच सरशी झाली. दक्ष जाधवने उपांत्य फेरीत अहमदनगरच्या हर्षवर्धन मोरे याचा पराभव केला होता. तर मुलींच्या मिडजेट गटात ग्लोरिया जॉर्ज हिने जेनीफर वर्गीस हिचा पराभव केला. ग्लोरियाने जेनीफरचा ५-११,११-७,११-६,११-६ असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यावर ग्लोरियाने शानदार खेळ केला. तीने पुढचे सलग तीनही सेट जिंकले आणि जेनिफरला पराभूत केले. मुलींच्या कॅडेट गटात संपदा भिवंडकर हिने टिया डिसुझा हिच्यावर १२-१०, ११-४,५-११,१४ -१२ असा विजय मिळवला. मुलांच्या कॅडेट गटात मैनाक निस्ताला याने राजवीर शाह याच्यावर ११-५,११-९,५-११, १२-१० असा विजय मिळवला. मुलींच्या सबज्युनिअर गटात मिहीका रोहिरा हिने नेहा महांगडे हिच्यावर ११-५, १२-१०, ११-८, ११-८ असा सलग चार सेटमध्ये विजय मिळवला. नेहा हिने दुसऱ्या सेट मध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेरच्या काही मिनिटात मिहीकाने उत्तम खेळ करत बाजी मारली. सब ज्युनियर मुलांमध्ये दिपीत पाटील याने देव श्रॉफ याच्यावर ५-११, १३-११, ११-९,११-४, ११-९ असा विजय मिळवला.