शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

जय-पराजयाचे अंतर कमी असेल!

By admin | Updated: May 27, 2016 03:57 IST

विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मी हैदराबाद आणि गुजरात यापैकी एका संघाला निवडणार नाही. दोन्ही संघ दमदार असल्याने लहान धावसंख्येचा बचाव करण्याचे तंत्र दोन्ही संघांना अवगत

- रवी शास्त्री लिहितो़...विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मी हैदराबाद आणि गुजरात यापैकी एका संघाला निवडणार नाही. दोन्ही संघ दमदार असल्याने लहान धावसंख्येचा बचाव करण्याचे तंत्र दोन्ही संघांना अवगत आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मॅक्युलम अथवा वॉर्नर नव्हे, तर अन्य खेळाडू देखील स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटविण्यास सज्ज आहेत.सामन्याचा धावफलक दुसऱ्या दिवशी सर्वकाही सांगत नाही. विपुल शर्मा किंवा एकलव्य द्विवेदी यांच्या दोन षटकारांचे महत्त्व देखील विषद होत नाही. झेल पकडण्यासाठी भुवनेश्वरने मारलेला सूर किती महत्त्वपूर्ण होता हे धावफलक पाहून सांगता येत नाही. ड्वेन स्मिथ किती धोकादायक आहे हे देखील धावफलकावरून कळणे शक्य नाही. खरेतर सामन्याचे चित्र पालटू शकणारे खेळाडू दोन्ही संघात आहेत. चांगल्या खेळाडूंचे गुणकौशल्य, टेंम्परामेंट आणि फिटनेस यातून कळत नाहीत. चांगले खेळाडू तेच जे परिस्थितीचे भान राखून कामगिरी करतात. खेळात कुठल्याक्षणी काय करावे, मोक्याच्या क्षणी संधीचा लाभ कसा घ्यावा आणि कुठल्यावेळी कुठले पाऊल उचलावे याची जाण ज्यांना असते तेच चांगले खेळाडू. आजच्या सामन्यात उभय संघ पॉवर प्लेमध्ये फिरकी गोलंदाजांचा वापर करतील अशी आशा आहे. वॉर्नर क्रिजवर असताना कसा खेळेल हे पाहण्याची उत्सुकता रवींद्र जडेजा याला असेलच. ब्रँडन मॅक्युलम आणि फिंच यांना विपुल शर्माकडून कसे आव्हान मिळेल, हे पाहायचेय. हैदराबाद संघ अद्याप तिसऱ्या क्रमांकाचा तिढा सोडवू शकला नाही. या क्रमासाठी वारंवार प्रयोग करण्यात आला पण कुणीही खेळाडू फिट बसलेला दिसत नाही. युवराज नव्या भूमिकेला न्याय देत आहे. संघाची सुरुवात चांगली झाल्यास युवराजला मोकळेपणाने खेळण्यास वाव असतो. युवीच्या फटक्यात ताकद आणि टायमिंग यांचे मिश्रण आहे. क्षेत्ररक्षणातही त्याचा दम दिसला. त्याने एका फलंदाजाला धावबाद करीत हे दाखवून दिले. आजच्या सामन्याचा निकाल काहीही असो; पण एक निश्चित की जय- पराजयाचे अंतर अगदीच कमी असेल. (टीसीएम)