शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस गेलवर आयपीएल बंदी शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2016 03:57 IST

महिलांबाबत अर्वाच्च शेरेबाजीप्रकरणी टीकेचे लक्ष्य बनलेला वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल याच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. दुर्व्यवहारामुळे ‘बिग बॅश’

नवी दिल्ली : महिलांबाबत अर्वाच्च शेरेबाजीप्रकरणी टीकेचे लक्ष्य बनलेला वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल याच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. दुर्व्यवहारामुळे ‘बिग बॅश’ स्पर्धेतून बाहेर झालेला हा खेळाडू आता आयपीएलमधूनही बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यावर बंदी घालण्यात येऊ शकते. आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला हे गेलबाबत आयपीएल संपताच रॉयल चॅलेंजर्स बॅँंगलोर आणि बीसीसीआयकडे त्याच्या असभ्य वागणुकीची तक्रार करणार असल्याचे वृत्त आहे. बुधवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘‘क्रिकेटपटूंनी सभ्य व्यवहार करीत मर्यादेत राहायला हवे. कुणाला आघात होईल किंवा कुणाचा अपमान होईल, असे वर्तन स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी करूच नये. लीगच्या काही मर्यादा आणि नियम आहेत. ते पाळले जावेत. खेळाडू नियमांपेक्षा मोठा नाही. सार्वजनिकरीत्या असभ्यपणा कुणीही स्वीकारणार नाही. याप्रकरणी मी बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांशी चर्चा करणार आहे.’’ बीसीसीआयने अद्याप याप्रकरणी कुठलेली वक्तव्य केले नाही, हे विशेष.बीसीसीआय सचिव अजय शिर्के म्हणाले, ‘‘गेल प्रकरण हे दोन विदेशी नागरिकांदरम्यानचे खासगी प्रकरण आहे. पण, याकडे दुर्लक्ष करू, असा याचा अर्थ नाही. कुणी तक्रार केल्यास गेलवर कारवाई केली जाईल.’’ ख्रिस गेल याने एका महिला पत्रकारासोबत असभ्य भाषेत अश्लाघ्य टिपणी केली. त्याआधी टेन नेटवर्कची महिला पत्रकार मेल मॅक्लागिनसोबत मुलाखतीदरम्यान असभ्य भाषेत संभाषण केल्याने गेल अडचणीत आला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलला टीकेचा सामना करावा लागला होता.