शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारत मागणार आयओएसीकडे दाद

By admin | Updated: June 7, 2015 01:08 IST

अमेरिकन दूतावासने विश्व युथ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तिरंदाजी पथकातील २१ सदस्यांना व्हीसा देण्यास नकार

नवी दिल्ली : अमेरिकन दूतावासने विश्व युथ चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तिरंदाजी पथकातील २१ सदस्यांना व्हीसा देण्यास नकार देण्याच्या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करताना भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) युवा खेळाडूंसोबत घडलेल्या या घटनेसाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी) व अमेरिकन आॅलिम्पिक संघटनेकडे विरोध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.आयओएचे सचिव राजीव मेहता म्हणाले, ‘भारतीय आॅलिम्पिक संघटना या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करीत आहे. भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. आमच्या तिरंदाजांची विश्वदर्जाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी वाया गेली आहे. यापेक्षा अशा प्रकारची घटना आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पुन्हा व्हायला नको, यासाठी आताच पावले उचलणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना व्हीसा नाकारण्यात आल्याची घटना प्रथमच घडली आहे. आयओए या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करीत आहे.’मेहता पुढे म्हणाला, ‘केवळ सात-आठ खेळाडूंना व्हीसासाठी मंजुरी मिळाली आणि उर्वरित सदस्यांना नकार देण्यात आला, याचे आश्चर्य वाटले. आम्ही आयओसी व अमेरिकन आॅलिम्पिक समितीला पत्र लिहिणार असून असे का घडले, याची विचारणा करणार आहे. आता तिरंदाजांना स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार नसली तरी भविष्यात असे पुन्हा घडू नये यासाठी आयओसी व अमेरिकन आॅलिम्पिक संघटनेला पत्र लिहिणार आहे.’ भारतीय संघाला व्हीसा न मिळाल्यामुळे अमेरिकेतील साऊथ डेकोटा येथील यांकटोनमध्ये होणाऱ्या विश्व युथ चॅम्पियनशिपमधून माघार घ्यावी लागली. भारतीय पथकातील ३१ पैकी २१ सदस्यांना मायदेशी परतणार नसल्याचे कारण देत व्हीसा देण्यास नकार देण्यात आला. अमेरिकन दूतावासने केवळ सात नेमबाज, दोन प्रशिक्षक व भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या एका अधिकाऱ्याला व्हीसा दिला तर २१ अन्य सदस्यांना व्हीसा देण्यास नकार दिला. भारताचे प्रसिद्ध प्रशिक्षक कोरियाचे चेन व्होम लिम यांनाही व्हीसा नाकारण्यात आला. ८ ते १४ जून या कालावधीत आयोजित स्पर्धेसाठी भारतीय पथक आज रवाना होणार होते. (वृत्तसंस्था)