शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

आयओए व क्रीडा महासंघांनी सर्व माहिती सार्वजनिक करावी : मंत्रालय

By admin | Updated: March 3, 2015 01:01 IST

क्रीडा मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक संघटना आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आपल्या कार्याची पद्धत व अर्थकारण यांची आॅनलाईन माहिती देणे अनिवार्य केले आहे.

नवी दिल्ली : क्रीडासंस्थांच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या क्रीडा मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक संघटना आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आपल्या कार्याची पद्धत व अर्थकारण यांची आॅनलाईन माहिती देणे अनिवार्य केले आहे. यात टाळटाळ करणाऱ्या महासंघांच्या मान्यतेबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले. मंत्रालयाने आयओए व क्रीडा महासंघांना पत्र पाठविले असून, दिलेले निर्देश भारतीय राष्ट्रीय क्रीडा विकास आचारसंहिता २०११ चा भाग असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालयाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की ‘अनेक राष्ट्रीय क्रीडा महासंघांतर्फे मंत्रालयाला आवश्यक माहिती देण्यात येते; पण अनेक महासंघांच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे सामान्य नागरिक व संबंधितांना आवश्यक माहिती उपलब्ध होत नाही.’क्रीडा मंत्रालयाने न्यायालयाच्या सूचनेचा आदर करताना, आयओए व राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध करावी, क्रीडा महासंघांनी अंकेक्षण अहवालासह बँक खात्याचे जमाखर्च विवरणपत्र ३० जूनपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली आहे. खात्याचे आॅडिट व जमाखर्च विवरणपत्र ३० जूनपर्यंत वेबसाईटवर लोड करणे अशक्य असल्याचे महासंघांनी मंत्रालयाला कळविले आहे.आयओए व राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी गेल्या आर्थिक वर्षाचा बँक खात्याचा तपशील वेबसाईटवर ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध करावा, असे मंत्रालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)च्भारतीय बॅडमिंटन महासंघ आणि युनियन बँक आॅफ इंडिया यांच्याबाबतच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रीय क्रीडा महासंघातर्फे माहितीच्या अधिकाराच्या नियमानुसार माहिती उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे म्हटले आहे.च्न्यायालयाने २४ डिसेंबर २०१४ रोजी दिलेल्या निर्णयात राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या कारभारावर भारत सरकारने लक्ष ठेवावे, असे म्हटले होते.