शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

धोनीविरुद्ध चौकशी समिती

By admin | Updated: June 21, 2015 01:02 IST

भारताचा एकदिवसीय आणि टी-२० सामन्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीत असणारा सहभाग

नवी दिल्ली : भारताचा एकदिवसीय आणि टी-२० सामन्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीत असणारा सहभाग शोधण्यासाठी ‘बीसीसीआय’ने चौकशी समिती स्थापन केली आहे. महेंद्रसिंग धोनीचा अत्यंत जवळचा मित्र अरुण पांडे याने ही रिती स्पोर्टस् कंपनी सुरूकेली असून, धोनीसह सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे या कंपनीत सहभागी आहेत. या कंपनीकडे आयपीएल फ्रँच्याईजी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मार्केटिंगची जबाबदारी होती. धोनीची या कंपनीत १५ टक्के भागीदारी असल्याचे मानले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआय’ने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष जगमोहन दालमिया स्वत: या समितीत असून, ज्योतिरादित्य सिंदिया आणि के. पी. कजारिया हे अन्य दोन सदस्य आहेत. दरम्यान, धोनी हा आपल्या कंपनीचा भागधारक राहिला नसल्याचे २0१३ मध्ये ‘रिती स्पोर्टस्’ने स्पष्ट केले होते; पण बीसीसीआय अद्याप या प्रकरणात रस घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. धोनी आणि पांडे हे इतर तीन कंपन्यांमध्ये एकत्र आहेत. रिती स्पोर्टस्मधील धोनीची भागीदारी ही थोड्या काळाकरिता आणि मागील काही देणी चुकती करण्याकरिता होती, असे पांडे यांनी याअगोदरच स्पष्ट केले आहे. धोनीचे इतर उद्योग आणि गुंतवणूकही आता रडारवर आल्याचे दिसत आहे. अहवालानंतरच भूमिका स्पष्ट करूचौकशी समितीचा अहवाल आल्यानंतरच आम्ही याबाबत जाहीर वाच्यता करू, असे दालमिया यांनी एका दैनिकाशी बोलताना स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की धोनी बाबतीत म्हणाल तर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. मी सांगितले होते की, अजित चंदीला विरुध्द अनुशासनात्मक कारवाईची मागणी अंतिम निर्णयापर्यंत लांबला आहे. धोनीच्या भागीदारी विषयी मला विचारण्यात आले तेव्हा मी एवढच म्हणालो होतो की, माझा इरादा बीसीसीआयने २०१३ मध्ये घेतलेल्या निर्णयाला लागू करण्याचा आहे. त्यावेळी मी सांगितले होते की, जर कोणता खेळाडू कुठल्याही क्रीडा व्यवस्थापक कंपनीशी कोणत्याही स्वरुपात जोडला गेला असेल, तर त्याची माहिती त्याने द्यावी.