शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या खात्यात दोन कांस्यपदकांची भर

By admin | Updated: September 23, 2014 06:08 IST

सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल यांनी स्क्वॅश कोर्टवर आज, सोमवारी इतिहास रचला, तर नेमबाजांनी पदक पटकाविण्याची मोहीम कायम राखली

इंचियोन : सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल यांनी स्क्वॅश कोर्टवर आज, सोमवारी इतिहास रचला, तर नेमबाजांनी पदक पटकाविण्याची मोहीम कायम राखली. १७ व्या आशियाई स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताला आपल्या खात्यात दोन कांस्यपदकांची भर घालण्यात यश आले. वुशू स्पर्धेत थोडम सनातोई देवी व नरेंद्र ग्रेवाल या भारतीय स्पर्धकांनी आपापल्या गटात उपांत्य फेरी गाठताना पदक निश्चित केले.घोषाल स्क्वॅशच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. घोषालचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे. पल्लिकलला उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या निकोल डेव्हिडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला तरी आशियाई स्पर्धेत कांस्यपदक पटकाविणारी ती पहिली भारतीय महिला स्क्वॅशपटू ठरली आहे. नेमबाजीमध्ये भारतीय पथकाने पदक पटकाविण्याची मोहीम कायम राखली आहे. महिला विभागात २५ मीटर पिस्तूल नेमबाजीमध्ये राही सरनोबत, अनिस सय्यद व हिना सिद्धू यांचा समावेश असलेल्या संघाने कांस्यपदकाचा मान मिळविला. महिला पिस्तूल संघ, स्क्वॅशपटू घोषाल व पल्लिकल आणि महिला हॉकी संघाचा अपवाद वगळता अन्य क्रीडा प्रकारांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंनी निराशा केली. पुरुष फुटबॉल संघ आणि टेनिस संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सोमवारी दोन पदकांची कमाई करणारा भारत पदकतालिकेत १३ व्या स्थानी आहे. भारताच्या खात्यात एक सुवर्ण व पाच कांस्यपदकांची नोंद आहे. १७ सुवर्णपदकांसह एकूण ४१ पदकांची कमाई करणारा चीन अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया (१३ सुवर्णपदकांसह एकूण १५ पदके) आणि जपान (७ सुवर्णपदकांसह एकूण २८ पदके) यांचा क्रमांक आहे. सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंची निराशाजनक कामगिरी कायम आहे. अमरजित सिंग नागी व अमृत सिंग यांना पुरुषांच्या स्प्रिंट पात्रता फेरीत अनुक्रमे १३ व १४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय जलतरणपटू संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. प्राथपन नायर याला पुरुषांच्या ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविता आली नाही. (वृत्तसंस्था)