शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फुटबॉल संघाचा बलाढय इटलीवर 2-0 ने विजय

By admin | Updated: May 20, 2017 12:00 IST

भारताच्या अंडर -17 फुटबॉल संघाने शुक्रवारी मैत्रीपूर्ण सामन्यात बलाढय इटलीवर 2-0 असा विजय मिळवला.

 ऑनलाइन लोकमत 

अॅरीझो, दि. 20 - भारताच्या अंडर -17 फुटबॉल संघाने शुक्रवारी मैत्रीपूर्ण सामन्यात बलाढय इटलीवर 2-0 असा विजय मिळवला. फुटबॉलच्या इतिहासात भारतीय संघाने प्रथमच अशी कामगिरी केली आहे. वर्ल्डकपची तयारी करण्यासाठी भारताचा अंडर-17 संघ सध्या युरोप दौ-यावर असून, इटलीच्या अंडर-17 संघाबरोबर मैत्रीपूर्ण लढतीचे आयोजन करण्यात आले होते. 
 
भारताकडून अभिजीत सरकारने 31 व्या आणि राहुल प्रवीणने 80 व्या मिनिटाला गोल केला. यावर्षी भारतामध्ये अंडर-17 फुटबॉलचा वर्ल्डकप होणार आहे. या सामन्यात भारताच्या युवा संघाने जास्तवेळ बॉल आपल्या ताब्यात ठेवला आणि गोलच्या अनेक संधी निर्माण केल्या. 
 
सामना सुरु झाल्यानंतर आठव्या आणि 13 व्या मिनिटाला भारताची गोल करण्याची संधी हुकली पण 31 व्या मिनिटाला अभिजीत सरकारने इटलीची बचावफळी भेदून सुंदर गोल केला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 80 व्या मिनिटाला राहुल प्रवीणने गोल करुन आघाडी 2-0 ने वाढवून शेवटपर्यंत टिकवली. या कामगिरीबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी टि्वटकरुन भारताच्या अंडर-17 संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तुमचा आम्हाला अभिमान आहे असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.