शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भारताची आता वन-डे ‘कसोटी’!

By admin | Updated: August 25, 2014 02:31 IST

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या भारतीय संघाची सोमवारपासून वन-डे ‘कसोटी’ सुरू होणार आहे.

ब्रिस्टॉल : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या भारतीय संघाची सोमवारपासून वन-डे ‘कसोटी’ सुरू होणार आहे. कसोटीतील पराभव माघारी टाकून वन-डेमध्ये चमकदार कामगिरी करण्याचे लक्ष्य धोनी ब्रिगेडवर असणार आहे. सराव सामन्यात मिडलसेक्स संघावर मिळवलेला विजय ही भारतासाठी एकमेव जमेची बाब असेल. या विजयाने भारतीय संघाच्या खचलेल्या आत्मविश्वासाला थोड्या प्रमाणात आशेची उभारी मिळाली आहे. कसोटी अपयशानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर सडकून टीका झाली. विराट कोहलीचा ‘फॉर्म’ ही संघासाठी ठरलेली सर्वांत मोठी डोकेदुखी असून, वन-डेत तरी त्यावर उतारा मिळेल अशी अपेक्षा आहे. २०१५ची वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेता भारतासाठी हा दौरा फार महत्त्वाचा होता आणि त्यादृष्टीने संघबांधणीही केली होती. कसोटीत याचा फारसा फायदा झाला नाही. कोहलीसह स्टुअर्ट बिन्नी, रहाणे, शिखर धवन, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि आर. अश्विन हे कागदी वाघ ठरले. दुसरीकडे इंग्लंड भारतीय संघाला पुन्हा पराभूत करण्यास उत्सुक आहे. अ‍ॅलेस्टर कुक, गॅरी बॅलन्स, इयान बेल, जोस बटलर यांची बॅट खोऱ्याने धावा करण्यास उत्सुक आहे. स्टुअर्ट ब्रॉड याला वन-डेत विश्रांती देण्यात आली असली तरी जेम्स अ‍ॅण्डरसन, स्टीवन फिन, क्रिस जॉर्डन हे गोलंदाजीची धुरा सांभाळण्यास सक्षम आहेत. त्यामुळे त्यांना वन-डेतही कसोटीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. (वृत्तसंस्था)