शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

राहुल द्रविड, अभिनव बिंद्रा शोधणार भारताचे ऑलिंपिक रत्न

By admin | Updated: July 25, 2014 15:09 IST

ऑलिंपिकमध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढावी यासाठी नेमलेल्या 'टार्गेट मिशन ऑलिंपिक पोडीयम' समितीमध्ये माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडसह अभिनव बिंद्रा आणि गोपीचंद यांचा समावेश आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २५ - २०१६ मध्ये रिओ आणि २०२० मध्ये टोकियो येथे होणा-या ऑलिंपिकमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी क्रीडा मंत्रालयाने 'टार्गेट मिशन ऑलिंपिक पोडीयम' समितीची नेमणूक केली असून या समितीमध्ये माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडसह अभिनव बिंद्रा आणि अनूराग ठाकूर यांचा समावेश आहे. ही समिती ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची निवड करणार आहे. 
ऑलिपिंकमध्ये भारताला आत्तापर्यंत फक्त २६ पदक मिळाले असून यात नऊ सुवर्ण, सहा रौप्य आणि ११ कांस्य पदकाचा समावेश आहे. नऊ पैकी आठ सुवर्ण पदकं भारताच्या हॉकी संघानेच मिळवून दिली आहेत. ऑलिंपिकमध्ये भारताच्या कामगिरीमध्ये सुधार व्हावा यासाठी क्रीडा मंत्रालयाने टार्गेट मिशन ऑलिंपिक समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार अनूराग ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली आहे.  माजी क्रिकेटपटू राहुल द्रवि्ड, ऑलिंपिकमध्ये भारताला पहिलेवहिले वैयक्तीक सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज अभिनव बिंद्रा, बॅडमिंटन प्रशिक्षक गोपीचंद, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अध्यक्ष अशा आठ जणांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती देशातील ७५ ते १०० प्रतिभावान खेळाडूंची निवड करेल. यात बॅडमिंडन,  अ‍ॅथेलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजी, बॉक्सिंग, कुश्ती या खेळांवर जास्त भर दिला जाईल. या सर्व खेळांमध्ये भारताने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. 
द्रविड, बिंद्रा या सारख्या खेळाडूंचा समितीमध्ये समावेश असणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. २०१६ च्या रिओतील ऑलिंपिंकमध्ये भारताला दोन आकडी पदकं तर २०२० मध्ये २० पदकं देशाला मिळावीत हे आमचे उद्दीष्ट असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. 
 
अशी काम करेल समिती 
निवड प्रक्रियेसाठी समितीला दोन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. खेळाडूंची निवड आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच केली जाईल. निवड प्रक्रियेसाठी व्यक्तीगत पातळीवर आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांकडून अर्ज मागवले जातील. यानंतर संबंधीत राष्ट्रीय प्रशिक्षक आणि महासंघांचा सल्ला घेतला जाणार असून त्यानंतर त्या खेळाडूची पूर्ण माहिती घेतली जाणार आहे. 
वर्षातून एकदा किंवा दोनदा निवड झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. या दरम्यान नवीन खेळाडूंचीही निवड करणे शक्य आहे. प्रतिभावान खेळाडूंची निवड झाल्यावर त्यांना उच्चदर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.