शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भारताची सामन्यावर पकड

By admin | Updated: December 5, 2015 00:41 IST

अजिंक्य रहाणेच्या शानदार (१२७ धावा)शतकी खेळीनंतर डावखुरा लेगस्पिनर रवींद्र जडेजा याने (३० धावांत पाच बळी) अर्धा संघ गारद करताच द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या दुसऱ्याच

नवी दिल्ली : अजिंक्य रहाणेच्या शानदार (१२७ धावा)शतकी खेळीनंतर डावखुरा लेगस्पिनर रवींद्र जडेजा याने (३० धावांत पाच बळी) अर्धा संघ गारद करताच द. आफ्रिकेविरुद्ध चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी भारताने पकड घट्ट केली.भारताने पहिल्या डावात ३३४पर्यंत मजल गाठल्यानंतर द. आफ्रिकेला दिवसअखेर ४९.३ षटकांत १२१ धावांवर रोखले. पहिल्या डावात २१३ धावांची मोठी आघाडी मिळविल्यानंतर कर्णधार विराट कोहली याने पाहुण्यांना फॉलोआॅन न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी सकाळी भारतीय फलंदाज दुसऱ्या डावाला प्रारंभ करतील. पाहुण्यांची फलंदाजी आज शेवटच्या सत्रात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. फिरोजशाह कोटलाची खेळपट्टी नागपूरसारखी नव्हती; पण जडेजाने ५ बळी घेत द. आफ्रिकेला गुडघे टेकायला भाग पाडले. जडेजाने १२ षटकांत ३० धावांत ५, आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने १३.३ षटकांत २६ धावांत २ आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव याने ३२ धावांत २ गडी बाद केले. ईशांतला १ गडी बाद करण्यात यश आले.भारताचा डाव उपाहारानंतर ५ षटकांच्या खेळात आटोपला. द. आफ्रिकेने चहापानापर्यंत १ गडी गमावून ३८पर्यंत मजल गाठली होती. अखेरच्या सत्रात मात्र ८३ धावांत त्यांनी ९ गडी गमावले. संघाची अशी पडझड होईल, असे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक ४२ धावा केल्या. तेम्बा बावूमा २२ आणि डीन एल्गर १७ यांनी सलामीला ३६ धावांची भागीदारी केली. यादवने एल्गरला यष्टिरक्षक साहाकडे झेल देण्यास बाध्य केले.चहापानानंतर पहिल्याच षटकात जडेजाने बावूमाची दांडी गूल केली. हशिम अमलाचा खराब फॉर्म येथेही कायम राहिला. त्याने ३४ चेंडूंत ३ धावा करीत साहाकडे झेल दिला. जडेजाने यानंतर डुप्लेसिसला भोपळा न फोडू देता तंबूची वाट दाखविली. उमेश यादवने ड्यूमिनीचा त्रिफळा उडविला. यासोबतच १७व्या कसोटीत त्याने ५० बळी पूर्ण केले. डेन विलास (११) ईशांतच्या चेंडूला बळी पडला. काइल एबोटला अश्विनने पायचित केले. दुसऱ्या टोकावर उभा असलेला डिव्हिलियर्स याचादेखील संयम सुटला. त्याने ईशांतकडे लाँगआॅनवर झेल दिला. जडेजाने पिएटला आणि अश्विनने इम्रान ताहिरला बाद करीत आफ्रिकेच्या डावाची सांगता करताच दिवसाचा खेळ संपला. त्याआधी सकाळी भारताने कालच्या ७ बाद २३१वरून खेळ सुरू केला. ५ षटकांत पुढचे तिन्ही फलंदाज बाद झाले. रहाणेने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिले शतक स्वत:च्या नावे केले. त्याने २१५ चेंडूंचा सामना करीत ११ चौकार व चार षटकारांसह १२७ धावा ठोकल्या. करिअरमधील हे त्याचे पाचवे शतक होते. धावफलकभारत : मुरली विजय झे. अमला गो. पिएट १२, शिखर धवन पायचित गो. पिएट ३३, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. एबोट १४, विराट कोहली झे. विलास गो. पिएट ४४, अजिंक्य रहाणे झे. डिव्हिलियर्स गो. ताहिर १२७, रोहित शर्मा झे. ताहिर गो. पिएट १४, रिद्धिमान साहा त्रि. गो. एबोट ०१, रवींद्र जडेजा झे. एल्गर गो. एबोट २४, रविचंद्रन अश्विन झे. डिव्हिलियर्स गो. एबोट ५६, उमेश यादव नाबाद १०, ईशांत शर्मा पायचित गो. एबोट ००. अवांतर (१२). एकूण ११७.५ षटकांत सर्वबाद ३३४. गोलंदाजी : मोर्कल २४-५-५८-०, एबोट २४.५-७-४०-५, पिएट ३८-६-११७-४, ताहिर १६-२-६६-१, एल्गर ११-०-३३-०, ड्युमिनी ४-०-१२-०. द. आफ्रिका : डीन एल्गर झे. साहा गो. उमेश १७, तेंबा बावुमा त्रि. गो. जडेजा २२, हाशिम अमला झे. साहा गो. जडेजा ०३, ए.बी. डिव्हिलियर्स झे. ईशांत गो. जडेजा ४२, फॅफ ड्यू प्लेसिस झे. रहाणे गो. जडेजा ००, जे.पी. ड्युमिनी त्रि. गो. उमेश ०१, डेन विलास त्रि. गो. ईशांत ११, केली एबोट पायचित गो. अश्विन ०४, डेन पिएट झे. रहाणे गो. जडेजा ०५, मोर्ने मोर्कल नाबाद ०९, इम्रान ताहिर झे. राहुल गो. अश्विन ०१. अवांतर (६). एकूण ४९.३ षटकांत सर्वबाद १२१. गोलंदाजी : ईशांत १२-५-२८-१, उमेश १२-३-३२-२, अश्विन १३.३-५-२६-२, जडेजा १२-२-३०-५.