शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पी.व्ही सिंधूची विजयी घौडदोड; सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 13:53 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने पुन्हा एकदा शानदार खेळी करून अवघ्या जगाचं लक्ष वेधलं आहे.

नवी दिल्ली - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूने पुन्हा एकदा शानदार खेळी करून अवघ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. सिंधूने शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यफेरीत जपानच्या सायना कावाकामीवर विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनमध्ये दोन सुपर ३०० जेतेपद पटकावली आहेत. लक्षणीय बाब म्हणज ३२ मिनिटं चाललेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात तिने २१-१५, २१-७ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. 

दरम्यान, सिंधू आता २०२२ च्या हंगामातील तिच्या पहिल्या सुपर ५०० विजेतेपदापासून फक्त १ पाऊल दूर आहे. विशेष म्हणजे आठ टूर्नामेंटनंतर तिने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी ती मार्च २०२२ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये योनेक्स स्विस ओपनच्या अंतिम फेरीत पोहचली होती आणि त्यामध्ये तिने विजय देखील मिळवला होता. या सामन्यापूर्वी सिंधूचा जपानच्या खेळाडूविरुद्धचा विक्रम २-० असा होता आणि हा सामना २०१८ मध्ये चायना ओपनमध्ये खेळला गेला होता.  सिंधूची फायनलमध्ये धडककधीकाळी विश्व चॅम्पियन राहिलेल्या सिंधूने जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेल्या कावाकामीला चितपट करून विजय मिळवला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात कावाकामीने अनेक चुका केल्या ज्यामुळे तिला पराभवाचा सामना करावा लागला. सिंधूने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत प्रहार करण्यास सुरूवात केली आणि अखेर फायनलचे तिकिट मिळवले. भारताच्या सिंधूने ब्रेकपर्यंत तीन गुणांची आघाडी घेत वर्चस्व कायम ठेवले होते. 

सिंधूने दोन व्हिडीओ रेफरल्सही जिंकून १८-१४ अशी आघाडी घेतली. नंतर कावाकामीच्या दोन मोठ्या चुकांमुळे सिंधूचा मार्ग सुखकर झाला आणि तिला सहज गेम जिंकता आला. दुसऱ्या गेममध्ये देखील कावाकामीला नियंत्रण ठेवता आले नाही ती ०-५ अशा फरकाने पिछाडीवर राहिली. 

जपानच्या खेळाडूला नमवून मिळवला विजयविशेष म्हणजे सिंधूने संपूर्ण गेमदरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूला अडकवून ठेवले आणि संयमाने तिच्या चुकांची वाट पाहिली. ११-४ च्या ब्रेकनंतर सिंधूने लगेचच १७-५ अशी आघाडी घेतली. सिंधूच्या आक्रमणाचे जपानच्या खेळाडूकडे कोणतेच उत्तर नव्हते. ज्यामुळे भारताच्या सिंधूला १९-६ अशी आघाडी घेता आली. बेसलाइनचा सिंधूचा शॉट जपानच्या खेळाडूने नेटवर मारल्यानंतर ती स्पर्धेतून बाहेर पडली आणि सिंधूच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधूsingaporeसिंगापूरIndiaभारतJapanजपान