शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

भारताने आॅस्ट्रेलिया ‘अ’ला गुंडाळले

By admin | Updated: September 10, 2016 03:45 IST

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला २२८ धावांत गुंडाळत पहिल्या डावात २ धावांची आघाडी मिळाली.

ब्रिस्बेन : वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅयोन आणि आॅफस्पिनर जयंत यादव यांनी घेतलेल्या प्रत्येकी ३ बळींच्या जोरावर भारत ‘अ’ संघाला पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला २२८ धावांत गुंडाळत पहिल्या डावात २ धावांची आघाडी मिळाली.भारत ‘अ’ संघाने पहिल्या डावात मनीष पांडे (७७) याच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर २३0 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघ २२८ धावांत गारद झाला. भारत ‘अ’ संघाने दिवसअखेर दुसऱ्या डावात १२ षटकांत २ बाद ४४ धावा केल्या. भारताची आता एकूण आघाडी ४६ धावांची झाली आहे. दुसऱ्या डावात अखिल हेरवाडकर २३ धावा व फैज फजल ६ धावांवर बाद झाला. श्रेयस अय्यर सहा आणि मनीष पांडे ७ धावांवर खेळत आहेत.आज सकाळी आॅस्ट्रेलियाने त्यांचा डाव बिनबाद २५ या धावसंख्येवरून पुढे सुरू केला. आॅस्ट्रेलियन संघ एकवेळ जो बर्न्स (७८) आणि कर्णधार पीटर हँडस्कॉम्ब (८७) यांच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे २ बाद १५७ अशा मजबूत स्थितीत होता; परंतु त्यानंतर यजमान संघाने त्यांचे अखेरचे ८ फलंदाज फक्त ७१ धावांत गमावले.कर्णधार हँडस्कॉम्बने ९३ चेंडूंत १५ चौकार व एका षटकारासह ८७ धावांचे योगदान दिले. जो बर्न्सने १२५ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ७८ धावा केल्या. भारताकडून वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोन याने १४. षटकांत ४१ धावांत ३ गडी बाद केले. त्याला आॅफ स्पिनर जयंत यादव याने १२ षटकांत ४४ धावांत ३ बळी घेत तोडीची साथ दिली. याशिवाय हार्दिक पांड्याने १0 षटकांत ३३ धावांत २ आणि शार्दूल ठाकूरने ४५ धावांत १ गडी बाद केला.>संक्षिप्त धावफलक भारत ‘अ’ (पहिला डाव) : २३0 आणि १२ षटकांत २ बाद ४४.आॅस्ट्रेलिया ‘अ’ (पहिला डाव) : २२८. (बर्न्स ७८, हँड्स्कॉम्ब ८७, अ‍ॅरान ३/४१, जयंत यादव ३/४४).