शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
3
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
4
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
5
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
6
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
7
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
8
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
10
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
11
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
12
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
13
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
14
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
15
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
16
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
17
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
18
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
19
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
20
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

भारत अ चौरंगी मालिका खेळणार

By admin | Updated: June 2, 2016 02:10 IST

आगामी आॅगस्ट महिन्यात भारत ‘अ’ संघ आॅस्टे्रलियामध्ये चौरंगी एकदिवसीय मालिका खेळणार असून यानंतर आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळेल

मेलबर्न : आगामी आॅगस्ट महिन्यात भारत ‘अ’ संघ आॅस्टे्रलियामध्ये चौरंगी एकदिवसीय मालिका खेळणार असून यानंतर आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळेल, असे क्रिकेट आॅस्टे्रलियाने (सीए) बुधवारी स्पष्ट केले. आॅस्टे्रलियाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ आणि अन्य एका आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध चौरंगी एकदिवसीय मालिकेसाठी आपल्या ‘अ’ तसेच नॅशनल परफॉर्मन्स संघाची घोषणा केली. या वेळी त्यांनी मालिकेतील चौथा संघ भारत असल्याचे घोषित केले.या चौरंगी मालिकेत एकूण १८ सामने असून मॅके, ब्रिस्बेन आणि टाऊन्सविले येथे ३० दिवस क्रिकेट खेळले जाईल. भारत ‘अ’ संघ टाऊन्सविले आणि मॅके येथे संपूर्ण आॅगस्ट महिनाभर चौरंगी मालिका खेळेल आणि त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला ब्रिस्बेन येथे आॅस्टे्रलिया ‘अ’विरुद्ध २ चारदिवसीय सामने खेळेल. ‘सीए’चे कार्यकारी व्यवस्थापक पैट होवार्ड यांनी सांगितले, ‘‘भारत ‘अ’च्या सहभागामुळे स्पर्धा अधिक आव्हानात्मक व चुरशीची झाली आहे. युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला व त्यांच्या विकासासाठी ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरेल. आॅस्टे्रलियाला ‘अ’ आणि नॅशनल परफॉर्मन्स टीमची निवड करण्यात आली असून राष्ट्रीय निवडकर्ते या स्पर्धेकडे उत्सुकतेने लक्ष देतील.’’ तसेच ‘‘या मालिकेत भारत व दक्षिण आफ्रिका संघ खूप मजबूत आहेत. यामुळे ही मालिका आमच्या खेळाडूंसाठी मोठे आव्हान असेल. या मालिकेतून प्रत्येक खेळाडूला खूप काही शिकण्याची संधी मिळेल,’’ असेही होवार्ड यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)वेळापत्रकचौरंगी एकदिवसीय मालिका :१३ आॅगस्ट : दक्षिण आफ्रिका ‘अ’ वि. नॅशनल परफॉर्मन्स (एनपीएस)१४ आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. भारत ‘अ’१६ आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. एनपीएस१७ आॅगस्ट : द. आफ्रिका ‘अ’ वि. भारत ‘अ’२० आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. द. आफ्रिका ‘अ’२१ आॅगस्ट : भारत ‘अ’ वि. एनपीएस२४ आॅगस्ट : एनपीएस वि. आॅस्टे्रलिया ‘अ’२५ आॅगस्ट : द. आफ्रिका ‘अ’ वि. भारत ‘अ’२७ आॅगस्ट : एनपीएस वि. भारत ‘अ’२८ आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. द. आफ्रिका ‘अ’३० आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. भारत ‘अ’३१ आॅगस्ट : द. आफ्रिका ‘अ’ वि. एनपीएस३ सप्टेंबर : अंतिम सामना (तृतीय संघ वि. चौथा संघ)४ सप्टेंबर : अंतिम सामना (पहिला संघ वि. दुसरा संघ)चारदिवसीय सामने मालिका :३० जुलै ते २ आॅगस्ट: आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. द. आफ्रिका ‘अ’६ ते ९ आॅगस्ट : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. द. आफ्रिका ‘अ’८ ते ११ सप्टेंबर : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. भारत ‘अ’१५ ते १८ सप्टेंबर : आॅस्टे्रलिया ‘अ’ वि. भारत ‘अ’