शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

भारत चार गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता

By admin | Updated: January 31, 2015 23:18 IST

तिरंगी मालिकेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ चार स्पेशालिस्ट गोलंदाजांसह खेळू शकतो,

पर्थ : तिरंगी मालिकेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर संघाची फलंदाजी मजबूत करण्यासाठी विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ चार स्पेशालिस्ट गोलंदाजांसह खेळू शकतो, असे संकेत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिले आहेत. आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाकडून तिरंगी मालिकेत चांगल्या कामगिरीची आशा होती, पण दिग्गज फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे भारताला या मालिकेत एकही विजय साकारता आला नाही. धोनी म्हणाला, ‘‘आम्ही तीन वेगवान व दोन फिरकीपटूंसह खेळू शकत नाही. कारण त्यामुळे आमची फलंदाजी कमकुवत होते.’’शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध तीन गड्यांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय कर्णधाराने विश्वकप स्पर्धेसाठी संभाव्य रणनीतीचे संकेत देताना म्हटले, ‘‘जर तुम्ही नाणेफेक गमाविली आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना काही विकेट लवकर गमाविल्यात तर संघ अडचणीत येतो. या वेळी आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली विश्वकप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या फलंदाजांचा आमच्या संघात समावेश आहे, पण प्रथम श्रेणी क्रिकेट व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करणे वेगळे आहे. त्यासाठी आम्ही रवींद्र जडेजाला बराच वेळ दिला असून तो आता अष्टपैलू म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.’’तिरंगी मालिकेतील चार सामन्यांत केवळ एक धाव व दोन विकेट घेणाऱ्या अक्षर पटेलबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला माहिती आहे की तो फलंदाजी करू शकतो, पण अधिक सामने खेळल्यानंतर तो परिपक्व होईल. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट व प्रथम श्रेणी क्रिकेट यामध्ये बराच फरक आहे. आम्हाला आमची फलंदाजी अधिक मजबूत करावी लागेल. तळाचे फलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.’’ विश्वकप स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्याबाबत बोलताना धोनी म्हणाला,‘‘आत्मविश्वासाचा विचार करता आम्ही चांगल्या स्थितीत आहोत. आम्ही योग्य रणनीती लागू करण्यावर भर दिला. पराभवाचे चक्र कसे भेदायचे याची आम्हाला चांगली कल्पना आहे. भारतीय संघ बऱ्याच दिवसांपासून येथे आहे. आमच्याकडे अद्याप १० दिवसांचा कालावधी आहे.’’संघाच्या विश्वकप स्पर्धेच्या तयारीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘‘या विश्रांतीच्या कालावधीत क्रिकेटपासून दूर राहणार आहे. खेळाडूंचा उत्साह कसा वाढवायचा, हा पत्रकार परिषदेत सांगण्याचा विषय नाही. हे क्रिकेटच्या मैदानावर शक्य नाही. त्यासाठी ब्रेकची गरज आहे. आम्ही दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून येथे आहोत. आम्हाला येथील वातावरणाची सवय झाली आहे. आता क्रिकेटपासून ब्रेक घेत पुढे काय करायचे, याचा विचार करणार आहे.’’ (वृत्तसंस्था)मी तळाच्या फळीत असल्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविले. तळाला बिन्नी व जडेजा हे फलंदाजही होते. आमची तळाची फळी मजबूत भासत होती. सुपर ओव्हर्समध्ये सलामीवीराला फलंदाजीसाठी पाठवू शकत नाही. नेहमीच्या लढतीत तुम्ही सलामीवीरांना फलंदाजीची जबाबदारी सोपवू शकतो, पण सुपर ओव्हरमध्ये फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाला पाठविणे आवश्यक ठरते. परिस्थिती ओळखून निर्णय घ्यावे लागतात. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत स्टार फलंदाज विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याच्या निर्णय घेतला.- महेंद्रसिंह धोनी