भारताने माफी मागण्यास भाग पाडले

By Admin | Updated: December 19, 2014 00:48 IST2014-12-19T00:48:55+5:302014-12-19T00:48:55+5:30

चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला पराभूत केल्यानंतर पाकच्या खेळाडूंनी केलेल्या आक्षेपार्ह इशाऱ्यांमुळे भारताने दबाव टाकून

India forced to apologize | भारताने माफी मागण्यास भाग पाडले

भारताने माफी मागण्यास भाग पाडले

नवी दिल्ली : चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला पराभूत केल्यानंतर पाकच्या खेळाडूंनी केलेल्या आक्षेपार्ह इशाऱ्यांमुळे भारताने दबाव टाकून माफी मागण्यास भाग पाडले, असे घूमजाव पाकिस्तानचे प्रशिक्षक शहनाज शेख यांनी केले आहे़
विशेष म्हणजे उपांत्य फेरीतील कृत्यामुळे पाकच्या दोन खेळाडूंवर निलंबनाची नामुष्की ओढवली होती़ या प्रकारानंतर खेद व्यक्त करताना शहनाज शेख यांनी हे कृत्य अशोभनीय असल्याचे म्हटले होते़ तसेच प्रकाराबद्दल भारताची माफीसुद्धा मागितली होती; मात्र आता पाकमध्ये गेल्यानंतर शेख यांनी आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असे म्हटले आहे़
शेख यांनी पुढे सांगितले की, आम्ही स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला होता़ त्यामुळे भारताची निराशा झाली होती़ याच कारणामुळे त्यांनी आमच्याविरुद्ध षड्यंत्र करून आमच्यावर दबाव टाकला़ याचा जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम झाला आणि आम्हाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले़ (वृत्तसंस्था)

Web Title: India forced to apologize