शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भारताने फलंदाजीमध्ये कमी प्रयोग केले

By admin | Updated: July 8, 2017 01:20 IST

अखेर भारताने ३-१ अशा मोठ्या फरकाने विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली; पण एकवेळ असेही वाटत होते की, जर वेस्ट इंडिज अखेरचा सामना

- अयाझ मेमन संपादकीय सल्लागार अखेर भारताने ३-१ अशा मोठ्या फरकाने विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली; पण एकवेळ असेही वाटत होते की, जर वेस्ट इंडिज अखेरचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरले, तर भारतासाठी हा मोठा धक्का बसला असता. कारण भारत तिसऱ्या क्रमांकाचा संघ असून, विंडीज नवव्या स्थानी आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सर्व अनपेक्षित ठरले असते. पाचवा सामना जिंकण्यात अपयश आले असते, तर भारताच्या प्रतिष्ठेला आणि खेळाडूंच्या आत्मविश्वासालाही नक्कीच मोठा झटका बसला असता. त्यामुळेच हा सामना खूप महत्त्वाचा होता. खास करून विराट कोहलीसाठी हा सामना महत्त्वाचा होता. केवळ फलंदाज म्हणून नाही, तर कर्णधार म्हणून जर का ही मलिका बरोबरीत सुटली असती, तर त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले असते. ज्याप्रकारे त्याच्यात आणि प्रशिक्षकामध्ये वाद झाला, ते पाहता त्याच्यावर स्वत:ला सिद्ध करण्याचा दबाव होता आणि त्याने ते केले. कोहलीने एक शतक ठोकले. त्याचे हे २८ वे शतक ठरले. ही जबरदस्त कामगिरी आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याने कर्णधार म्हणून जिंकण्याची जी जबाबदारी घेतली होती, त्यात तो यशस्वी ठरला. अखेरपर्यंत टिकून राहताना त्याने संघाला विजयी मार्गावर नेले. केवळ स्वत:साठी न खेळता संघाला विजयापर्यंत नेणे, ही महान खेळाडूची एक ओळख असते. कोहलीला या सामन्यात दिनेश कार्तिकने चांगल्या प्रकारे साथ दिली. विशेष म्हणजे, खेळाडूंच्या बदलाविषयी केलेले प्रयोग विशेष वाटले नाहीत. युवराज जखमी होता. त्याच्या जागी आलेल्या कार्तिकविषयी जास्त काही सांगायची आवश्यकता नाही. तो दहा वर्षांपासून खेळत आहे. इथे त्याला चांगली संधी मिळाली. तसेच रिषभ पंतला आजमवायला पाहिजे होते. आगामी विश्वचषकच्यादृष्टीने त्याची तयारी पाहता आली असती. त्यामुळे ही एक संधी भारताने गमावली असल्याचे मला वाटते. मालिकेत संघात फारसे बदल करण्यात आले नाहीत. सातत्यपूर्ण कामगिरी मान्य आहे; पण प्रयोग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गोलंदाजीत चांगल्या प्रकारे प्रयोग करण्यात आले. मोहम्मद शमीने पुनरागमन करीत चार बळी घेतले. त्याच्या व्यतिरिक्त उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली. कुलदीप यादवने वेगळी छाप पाडली. गोलंदाजीमध्ये प्रत्येकाने छाप पाडली. वेगवान गोलंदाज वेगवान गोलंदाजांवर, तर फिरकी गोलंदाज फिरकी गोलंदाजांवर दडपण टाकीत होते. असाच प्रकार फलंदाजीमध्येही व्हायला पाहिजे होता. संघातील जागा कोणीही गृहित धरू शकत नाही आणि हाच दृष्टिकोन असायला हवा, हे माझे मत आहे. यामुळे संघात स्थिरावलेल्या खेळाडूंवरही सातत्यपूर्ण कामगिरीचे दडपण राहील. आता बघूया टी-२० सामन्यात काय होतंय ते.