शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

भारत पराभव टाळणार?

By admin | Updated: February 10, 2015 02:03 IST

एकापाठोपाठ एक पराभव आणि काही प्रमुख खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्रस्त असलेला भारतीय संघ विश्वकप स्पर्धेपूर्वी

अ‍ॅडिलेड : एकापाठोपाठ एक पराभव आणि काही प्रमुख खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्रस्त असलेला भारतीय संघ विश्वकप स्पर्धेपूर्वी अखेरच्या सराव सामन्यात मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्ध आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवाची मालिका खंडित करण्यास उत्सुक आहे. विश्वकप स्पर्धेपूर्वी अंतिम ११ खेळाडूंचा संघ निश्चित करण्याची भारताला ही अखेरची संधी आहे.भारतीय संघाला आॅस्ट्रेलिया दौऱ्यात अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. कसोटी मालिका आणि तिरंगी मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला रविवारी अ‍ॅडिलेड ओव्हलमध्ये पहिल्या सराव सामन्यात यजमान आॅस्ट्रेलियाविरुद्ध १०६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. आॅस्ट्रेलियाने ३७१ धावांची दमदार मजल मारली. त्यानंतर भारतीय फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. भारतीय संघ ४५.१ षटकांत २६५ धावांत गारद झाला. आॅस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका आणि त्यानंतर तिरंगी मालिकेदरम्यान निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागले. कर्णधार धोनीचा फॉर्मही संघासाठी चिंतेचा विषय आहे. पहिल्या सराव सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. या व्यतिरिक्त ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रोहित शर्मा यांच्या दुखापती व आघाडीच्या फलंदाजांचे अपयश यांमुळे भारतीय संघ त्रस्त आहे. ईशांत फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याच्या स्थानी आता मोहित शर्माला संधी मिळाली आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातील पराभवानंतरही धोनीने सामन्यातील काही सकारात्मक बाबींवर चर्चा केली; पण संघाची मैदानावरील कामगिरी २०११च्या चॅम्पियन्ससाठी चिंतेचा विषय ठरली आहे. पाकिस्तानविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पहिल्या लढतीसाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड अद्याप निश्चित झालेली नाही. दुसऱ्या बाजूचा विचार करता विश्वकप स्पर्धेत सहभागी होत असलेला अफगाणिस्तान संघ या स्पर्धेत छाप सोडण्यास उत्सुक आहे. अनुभवी मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील या संघात वेगवान गोलंदाज शापूर जादरान, युवा वेगवान गोलंदाज आफताब आलम व माजी कर्णधार व मधल्या फळीतील फलंदाज नवरोज मंगल यांचा समावेश आहे. या संघाने २०११मध्ये पूर्णकालीन वन-डे संघाचा दर्जा मिळविला आहे. नबीने दावा केला आहे, की अफगाणिस्तान संघ विश्वकप स्पर्धेत आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरेल. (वृत्तसंस्था)