भारत-द. आफ्रिका लढत आज

By Admin | Updated: July 8, 2017 01:16 IST2017-07-08T01:16:06+5:302017-07-08T01:16:06+5:30

भारतीय महिला हॉकी संघ विश्व लीग सेमिफायनलमधील ब गटात आज शनिवारी पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे

India-The Africa fight today | भारत-द. आफ्रिका लढत आज

भारत-द. आफ्रिका लढत आज

जोहान्सबर्ग : भारतीय महिला हॉकी संघ विश्व लीग सेमिफायनलमधील ब गटात आज शनिवारी पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. राणी रामपालच्या नेतृत्वात भारतीय संघ येथे आठवडाभरापूर्वीच दाखल झाल्यामुळे त्यांची तयारीदेखील भक्कम झाली आहे.
त्याआधी भारतीय खेळाडूंनी हिमाचलमधील शिलारु येथे सराव करीत द. आफ्रिकेतील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. मुख्य कोच जोर्ड मारिज्ने म्हणाले, ‘आम्ही मागच्या आठवड्यात चांगला सराव केल्यामुळे फिटनेस वाढला आहे.’ (वृत्तसंस्था)
भारताला आपल्या गटात चिली, अमेरिका, अर्जेंटिना आणि द. आफ्रिकेविरुद्ध सामने खेळायचे आहेत. द. आफ्रिका आणि चिली संघ रँकिंगमध्ये भारताच्या खाली आहेत. मात्र अमेरिका आणि अर्जेंटिना संघांकडून कडवे आव्हान राहील. (वृत्तसंस्था)

Web Title: India-The Africa fight today