शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयकडून उशीर झाल्यास नकार समजणार

By admin | Updated: October 22, 2015 01:01 IST

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबतची चर्चा रद्द झाल्यानंतर जर भारतीय

कराची : पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यासोबतची चर्चा रद्द झाल्यानंतर जर भारतीय मंडळाकडून डिसेंबर महिन्यात प्रस्तावित मालिकेवर निर्णय घेण्यास उशीर होत असेल, तर त्याला आपण नकार समजणार, असे त्यांनी सांगितले.शहरयार यांनी बुधवारी ट्वीट केले, ‘भारताकडून निर्णय घेण्यास उशीर होत असेल, तर आम्ही प्रस्तावित मालिकेविषयी त्यांच्याकडून नकार समजणार. आमच्याकडे जास्त वेळ उरलेला नसल्यामुळे निर्णयाविषयीचे उत्तर होकारात्मक अथवा नकारात्मक असो, परंतु उत्तर आवश्यक आहे. तसेच भारत - पाक दरम्यान द्विपक्षीय क्रिकेटचे संबंध डिसेंबरमध्ये आमच्या क्रिकेट मालिकेच्या क्षमतेवर अवलंबून आहे,’ असेही खान यांनी सांगितले. अन्यथा माघार घेऊ...भारतात झालेल्या विरोधामुळे निराश झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष यांनी भारतात पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतातील सुरक्षा पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही खान यांनी स्पष्ट केले.मिळालेल्या माहितीनुसार खान यांनी बीसीसीआयला स्पष्ट सांगितले आहे की, डिसेंबरमधील प्रस्तावित भारत - पाक मालिकेसंबधी लवकर निर्णय द्यावेत, अन्यथा पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाक संघाच्या निर्णयाबाबत पीसीबी आपली भूमिका स्पष्ट करेल. पाकिस्तानचा अंधांच्या क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार भारत-पाकिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेची आशा जवळपास मावळल्याने चिडलेल्या पाकिस्तानने आता भारतात पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या अंधांच्या आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी ब्लाईंड क्रिकेट कौन्सिलने (पीबीसीसी) स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगितले आहे. भारताबरोबर असलेल्या तणावपूर्ण संबंधामुळे, पाकिस्तानी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.