समान

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:30+5:302014-12-18T22:39:30+5:30

उभय संघांना समान संधी

Identical | समान

समान

य संघांना समान संधी
भारत ४०८, ऑस्ट्रेलिया ४ बाद २२१
ब्रिसबेन : तळाचा फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही, पण उमेश यादवने यजमान संघाच्या तीन फलंदाजांना झटपट माघारी परतवत यजमान संघावर वर्चस्व गाजविले. कालच्या ४ बाद ३११ धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा डाव ४०८ धावांत संपुष्टात आला. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या हेजलवुडने ५ बळी घेत भारताचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्युत्तरात खेळताना ऑस्ट्रेलियाने ४ बाद २२१ धावांची मजल मारली आहे. यजमान संघाला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप १८७ धावांची गरज आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी कर्णधार स्टिव्हन स्मिथ (६५) आणि मिशेल मार्श (७) खेळपट्टीवर होते. तीन दिवसांचा खेळ शिल्लक असलेल्या या कसोटीत उभय संघांना समान संधी आहे. (अधिक वृत्त क्रीडा पानावर)

Web Title: Identical