शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक यजमानपद संयुक्तपणे देण्याचा विचार

By admin | Updated: November 19, 2014 23:31 IST

यजमानपद एका शहराला देण्याची परंपरा मोडीत काढण्याचा आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक परिषदेचा (आयओसी) विचार आहे.

लुसाने : यजमानपद एका शहराला देण्याची परंपरा मोडीत काढण्याचा आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक परिषदेचा (आयओसी) विचार आहे. यापुढे एखादा संपूर्ण देश, एकापेक्षा अधिक शहरे किंवा एकाहून अधिक देशांना संयुक्तपणे हे आयोजन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॉश यांच्या सुधारणावादी अजेंड्यात ज्या ४० सुधारणांचा उल्लेख आहे, त्यातही या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त बोली प्रक्रियेमुळे क्रीडा स्पर्धा अधिक आकर्षक तर होतीलच, शिवाय आर्थिक ओझे कमी होईल, असा विश्वास आयओसीने व्यक्त केला.पत्रकारांशी बोलताना बॉश म्हणाले, ‘आम्ही दावेदारीत सुसूत्रता आणू इच्छितो. या नव्या प्रस्तावांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन यजमान शहराबाहेर किंवा विशिष्टप्रकरणी दुसऱ्या देशात आयोजनाची आयओसी परवानगी देईल. हिवाळी आॅलिम्पिकमधील काही क्रीडा प्रकार सीमारेषेजवळील इतर देशात आयोजित करण्यात येतात; पण उन्हाळी आॅलिम्पिकमध्ये असे प्रथमच होईल. बॉश यांच्या प्रस्तावानुसार उन्हाळी आॅलिम्पिकमधील २८ क्रीडा प्रकारांमध्ये आणखी काही खेळांची भर पडू शकते; पण खेळाडूंची संख्या मात्र १०,५०० इतकीच राहील आणि पदकेदेखील ३१० वाटली जातील. प्रस्तावानुसार यजमान शहर आपल्या पसंतीचे एक दोन खेळ सहभागी करण्याचा प्रस्ताव ठेवू शकते. अर्थात, २०२०च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये बेसबॉल आणि सॉफ्टबॉल या खेळांचा समावेश होऊ शकतो. हे दोन्ही खेळ २००८ च्या बीजिंग आॅलिम्पिकपासून वगळण्यात आले. जपानमध्ये मात्र हे खेळ लोकप्रिय आहेत. (वृत्तसंस्था)