युरो चषकात आइसलँडचा इंग्लंडवर 2-1नं रोमहर्षक विजय

By Admin | Updated: June 28, 2016 07:16 IST2016-06-28T06:42:53+5:302016-06-28T07:16:58+5:30

युरो चषकात छोटा देश असलेल्या आइसलँडचा इंग्लंडला पराभवाची धूळ चारून मोठी कामगिरी केली आहे.

Iceland beat England 2-1 in Euro Cup | युरो चषकात आइसलँडचा इंग्लंडवर 2-1नं रोमहर्षक विजय

युरो चषकात आइसलँडचा इंग्लंडवर 2-1नं रोमहर्षक विजय

ऑनलाइन लोकमत, 
फ्रान्स, दि. 28 - युरो चषकात छोटा देश असलेल्या आइसलँडनं इंग्लंडला पराभवाची धूळ चारून मोठी कामगिरी केली आहे. आइसलँडनं इंग्लंडचा 2-1 अशा फरकानं पराभव केला आहे. इंग्लंडसाठी हा पराभव लाजिरवाणा मानला जातो आहे.

चौथ्या मिनिटाला पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडच्या वॅन रुनीनं आघाडी घेतली होती. मात्र 18व्या मिनिटाला आइसलँडच्या रगनार सिगुडसन आणि कोल्बिनन सिगथोरसननं गोल करून इंग्लंडच्या कमकुवतपणाचा बचावात्मकरीत्या फायदा घेत विजय मिळवला.

आइसलँडनं इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव तर केलाच. या विजयामुळे आइसलँडचा फ्रान्सविरोधात क्वॉर्टर फायनलमध्ये खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

Web Title: Iceland beat England 2-1 in Euro Cup