शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ICC Champions Trophy : महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित

By admin | Updated: June 1, 2017 14:48 IST

अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन अव्वल फलंदाजांच्या नाकीनऊ आणणारा ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित झाला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 1 - अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन अव्वल फलंदाजांच्या नाकीनऊ आणणारा ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅग्राथ भारतीय गोलंदाजीने प्रभावित झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणा-या भारतीय गोलंदाजांच्या चमूचे मॅग्राथने कौतुक केले आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीमुळे भारतीय टीम अन्य संघांपेक्षा वरचढ ठरेल असे मत मॅग्राथने व्यक्त केले. 47 वर्षीय मॅग्राथ सध्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी आला आहे. 
 
दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारानेही भारताकडे संतुलित संघ असून वेगवान गोलंदाजीमुळे भारताच्या जेतेपदाची शक्यता अधिक असल्याचे म्हटले होते. मागच्या दोन-तीन वर्षात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारताची गोलंदाजीची बाजू सशक्त आहे. वेगवान आणि फिरकी मा-यामुळे भारतीय संघ जास्त वरचढ ठरेल असे मॅग्राथने म्हटले आहे. 
 
आणखी वाचा 
 
रविवारी पारंपारिक पाकिस्तान विरुद्ध होणा-या पहिल्या सामन्यात भारताला विजयाची संधी जास्त असल्याचे त्याने म्हटले आहे. भारत-पाकिस्तान मॅच नेहमीच मोठी असते. पाकिस्तानकडेही चांगले दर्जेदार गोलंदाज आणि अनुभवी फलंदाज आहेत. तुम्ही सांगू शकत नाही पण पाकिस्तानही आश्चर्यकारक निकालाची नोंद करु शकतो असे मॅग्राथने म्हटले आहे. 
 
भारतीय संघ उपांत्यफेरीत पोहोचेल. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तीन टीम्स सेमीफायनल खेळतील असा अंदाज मॅग्राथने वर्तवला असून, चौथा संघ न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिका असेल. मॅग्राथला जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या दोन गोलंदाजांनी जास्त प्रभावित केले आहे. बुमराह एकदिवसीय क्रिकेटसाठी चांगला गोलंदाज असून उमेशही चांगली गोलंदाजी करतोय.  
 
खासकरुन हाणामारीच्या षटकांमध्ये दोघांची गोलंदाजी वाखाणण्याजोगी असते असे मॅग्राथने म्हटले आहे. गतविजेता भारतच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. भारताकडे जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले होते.  रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजा हे भारताचे फिरकी गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त कामगिरी करत असून, कर्णधार विराट कोहली भले आयपीएलमध्ये अपयशी ठरला असेल पण इथे तो दमदार कामगिरी करेल असा संगकाराला विश्वास वाटतो.