हैदराबादचे बंगऴुरुला १९५ धावांचे आव्हान
By admin | Published: April 30, 2016 10:39 PM2016-04-30T22:39:27+5:302016-04-30T22:39:27+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वात सनरायझर्स हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुला १९५ धावांचे आव्हान दिले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ३० - आयपीएलच्या नवव्या पर्वात सनरायझर्स हैदराबादने कर्णधार डेव्हिड वॉर्नच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुला १९५ धावांचे आव्हान दिले आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २० षटकात पाच बाद १९४ धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ५० चेंडूत पाच षटकार आणि नऊ चौकार लगावत ९२ धावा केल्या. त्याला एबी डीव्हिलियर्सने झेलबाद करुन शतक करण्यापासून रोखले. तर, केन विल्यम्सननेही चांगली खेळी केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. केन विल्यम्सनने ३८ चेंडूत ५० धावा कुटल्या. शिखर धवन अवघ्या ११ धावा काढून तंबूत परतला. शिखर धवनला केन रिचर्डसनने झेलबाद केले. नमन ओझा अवघ्या एका धावेवर बाद झाला. दीपक हुडा दोन धावांवर धावचीत झाला. तर,
रॉयल चॅलेंजर्स बंगऴुरुकडून गोलंदाज केन रिचर्डसनने दोन बळी घेतले, तर तबरेज शम्सी आणि शेन वॉटसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.