शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबाद संघावर राजस्थानी तडका भारी

By admin | Updated: April 4, 2015 04:12 IST

सुर्यप्रकाश सुवालका (५०) आणि अंकित लांबा (४४) या सलामीवीरांची आक्रमक फलंदाजी आणि अनिकेत चौधरी (३/१०) केलेला अचूक मारा या जोरावर

कटक: सुर्यप्रकाश सुवालका (५०) आणि अंकित लांबा (४४) या सलामीवीरांची आक्रमक फलंदाजी आणि अनिकेत चौधरी (३/१०) केलेला अचूक मारा या जोरावर राजस्थानने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या बाद फेरीत सलग दुसरा विजय मिळवताना हैदराबादला ८६ धावांनी लोळवले. बाद फेरीतील राजस्थानचा हा सलग दुसरा विजय असून हैदराबादला मात्र सलग दुसरा पराभव पत्करावा लागला.हैदराबादने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. मात्र हा निर्णय हैदराबादच्या चांगलाच अंगलट आला. सुर्यप्रकाश व अंकित यांनी जबरदस्त फटकेबाजी करताना ८.३ षटकांत ८२ धावांची सलामी दिली. यानंतर सुवालकाने आक्रमणाची सुत्रे स्वत:कडे ठेवताना ९ चौकारांसह ३२ चेंडुत ५० धावा कुटल्या. यानंतर मनजीत सिंग (१८) आणि राजेश बिष्णोई (३१) यांनी निर्णायक क्षणि केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने ७ बाद १८३ धावांची आव्हानात्मक मजल मारली. रवी किरण, चामा मिलिंद आणि पगदाला नायडू यांनी प्रत्येकी २ बळी घेताना राज्स्थानला रोखण्याचा प्रयत्न केला.या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव १८.५ षटकांत ९७ धावांत संपुष्टात आला. कर्णधार हनुमा विहारी (४६) आणि चामा मिलिंद (१०) या दोघांचा अपवाद वगळता हैदराबादच्या एकाही फलंदाजाला दुहेरी संख्या गाठता आली नाही. अनिकेत चौधरीने हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार पाडताना १० धावांत ३ खंदे फलंदाज माघारी पाठवले. तर अशोक मनेरीया आणि चंद्रपाल सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेत अनिकेतला चांगली साथ दिली. (वृत्तसंस्था)