शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

विनेश प्रमाणे अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन; १० तासांत ४.६ Kg वजन कमी करून जिंकलं ब्राँझ मेडल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 10:46 IST

हार न मानता काही 10 तासांत 4 किलो पेक्षा अधिक वजन कमी करून तो मॅटवर उतरला आणि त्यानं मैदानही मारलं. 

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. अंतिम लढतीआधी वजन वाढल्यामुळे तिची सुवर्ण पदकाची संधी हुकली. तिला रौप्य पदक मिळणार का? याकडे नजरा लागून राहिल्या असताना युवा पैलवान अमन सेहरावत याने कुस्तीच्या आखड्यातून भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मिळवून दिले. विनेश फोगाटप्रमाणेच हा पैलवान देखील गोत्यात आला असता. कारण उंपात्य लढतीतील पराभवानंतर त्याचेही वजन वाढले होते. पण हार न मानता काही तासांत ४ किलो पेक्षा अधिक वजन कमी करून तो मॅटवर उतरला आणि त्यानं मैदानही मारलं. 

अन् अमन सेहरावत समोर उभं राहिलं ओव्हरवेटचं चॅलेंज  

अमन सेहरावत याने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले. उपांत्य फेरीतील पराभवानंतर कांस्य पदकावरील दावा भक्कम करणं एक वेगळे आव्हान असते. त्यात अमन समोर ओव्हरवेटचही चॅलेंज होते. उपांत्य फेरीतील पराभवानंतर या भारतीय पैलवानाचे वजन जवळपास 4.6 किलोनं वाढलं होते. कांस्य पदकाच्या लढतीआधी त्याने कमी करून दाखवतं, जगातील मानाच्या स्पर्धेत भारतीय कुस्तीची मान उंचावण्याचे काम केले.

सेमी फायनल लढतीनंतर अमनच्या वजनाचा आकडा पोहचला होता ६१.५ Kg 

 पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी उपांत्य फेरतील लढतीनंतर अमन सेहरावत याचे वजन ६१.५ किलोवर पोहचले होते. तो ५७ किलो वजनी गटात असल्यामुळे नियमानुसार त्याचे वजन ४.५ किलो ग्रॅमपेक्षा अधिक होते. कांस्य पदकासाठीच्या लढतीआधी  त्याच्यासमोरही विनेश फोगाटप्रमाणे अपात्रतेची टांगती तलवार होती. भारतीय कोच जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया यांच्यासमोरही  ब्राँझ मेडलसाठीच्या लढतीआधी अमनचं वजन कमी करण्याचे आव्हान उभे राहिले होते.विनेश फोगाटवर ओढावलेले संकट पुन्हा एका पैलवानावर ओढावण्याची भीती निर्माण झाली होती. कारण विनेशला फक्त  100 ग्रॅम वजन अधिक असल्यामुळे अपात्र केले होते. अमनला तर कमी वेळात काही किलोच्या घरात वजन कमी करायचे होते. 

वजन घटवण्यासाठी अशी केली कसरत

अमन सेहरावत याची वजन कमी करण्याची कसरत ही दिड तासांच्या मॅट सेशनसह सुरु केली. भारताच्या दोन्ही कुस्ती प्रशिक्षकांनी त्याला प्रेरित केले. मॅटवरील सेशन आटोपल्यावर तासभर गरम पाण्याने आंघोळ केली. त्यानंतर ट्रेडमिलवर व्यायाम करण्यावर त्याने जोर दिला. न थांबता तासभर ट्रेडमिलवर धावण्याची कसरत त्याने केली.  जिममध्ये घाम गाळण्याशिवाय  सॉना बाथचे 5 मिनिटांचे पाच सेशनसह काही तासांत 4 किलो वजन कमी करण्याच्या प्रवासात अमन सेहरावतनं लिंबू आणि मध टाकून कोमट पाणी आणि कॉफीला पसंती दिली. या सर्व कसरतीसह त्याने मॅच आधी आपलं वजन ५६.९ Kg वर आणले जे त्याच्या वजन गटानुसार १०० ग्रॅमनं कमी होते.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Wrestlingकुस्तीVinesh Phogatविनेश फोगट