शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डिकॉक, पंतकडून आक्रमक खेळीची आशा

By admin | Updated: May 12, 2016 02:48 IST

डेअरडेव्हिल्सची मोहीम निर्णायक वळणावर आहे. या संघाला हैदराबादेत हैदराबादविरुद्ध दोन हात करायचे आहेत. खेळाडूंना मैदानावर आणखी तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल

डेअरडेव्हिल्सची मोहीम निर्णायक वळणावर आहे. या संघाला हैदराबादेत हैदराबादविरुद्ध दोन हात करायचे आहेत. खेळाडूंना मैदानावर आणखी तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. दिल्ली संघाने स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. डेअरडेव्हिल्स हे करू शकतो, ही चांगली बाब म्हणावी लागेल.प्ले आॅफच्या रेसमध्ये हैदराबाद, गुजरात, कोलकाता आघाडीवर आहेत. दिल्ली आणि मुंबईसाठी प्ले आॅफची दारे काहीशी बंद दिसत आहेत. चालत्या बसमध्ये चढण्यासाठी लोखंडी रॉडला पकडण्याची धडपड आठवते का, अनेकदा लोखंडी रॉड हातातदेखील येत नसे. हीच स्थिती मुंबईवर ओढवली. दिल्लीची स्थिती तशी खराब नाही. या संघाचे किमान सहा फलंदाज अर्धशतकवीर आहेत. या संघातील अनेक खेळाडू प्रतिस्पर्धी संघाला हरवण्याची ताकद बाळगतात. अशास्थितीतही दिल्लीला एखाद्या बाहुबली खेळाडूची गरज आहेच. शानदार शतक झळकविल्यापासून डिकॉकची बॅट शांत आहे. त्याच्याकडून संघाला कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची गरज असेल. चांगली कामगिरी करणारे संघ सलामीवीरांवर बऱ्याचअंशी विसंबून आहेत. पण, दिल्लीला सलामीवीरांकडून कधीच चांगली सुरुवात लाभली नाही. क्विंटन डिकॉक आणि ऋषभ पंत सलामीला आक्रमक खेळून दिल्लीची सुरुवात धडाकेबाज करू शकतात. सध्या मॉरिस आणि ब्रेथवेट यांना विश्रांती देण्यात येत आहे. अधूनमधून त्यांना संघात स्थान दिले जाते. वेगवान गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास दिल्लीकडे अशा खेळाडूंची उणीव नाही. जहीर, शमी आणि मॉरिस यांच्यानंतर कोल्टर नाईलची सेवा शिल्लक आहे. फिरकीत अमित मिश्रा आणि इम्रान ताहिरपाठोपाठ ड्युमिनी आणि नदीम आहेतच. (टीसीएम)