टीम इंडियाचं होळी सेलिब्रेशन

By Admin | Updated: March 24, 2016 12:51 IST2016-03-24T12:51:48+5:302016-03-24T12:51:48+5:30

देशभरात होळी साजरी केली जात असताना भारतीय क्रिकेट संघदेखील होळी साजरी करत आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंचे होळी साजरा करतानाचे फोटो बीसीसीआयने ट्विट केले आहेत

Holi celebration of Team India | टीम इंडियाचं होळी सेलिब्रेशन

टीम इंडियाचं होळी सेलिब्रेशन

ऑनलाइन लोकमत - 
बंगळुरु, दि. २४ - देशभरात होळी साजरी केली जात असताना भारतीय क्रिकेट संघदेखील होळी साजरी करत आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंचे होळी साजरा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ बीसीसीआयने ट्विट केले आहेत. यामध्ये विराट कोहली, युवराज सिंग, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, रोहीत शर्मा, हरभजन सिंग एकमेकांना रंग लावत सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेदेखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो ट्विट करत देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
टी20 वर्ल्डकपमुळे क्रिकेट संघ सध्या व्यस्त आहे. मात्र त्यातूनही वेळ काढून ते सेलिब्रेशन करत आहेत. अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशचा फक्त एका रनने पराभव करत भारताने बुधवारीच विजयाचे रंग उधळले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यानेदेखील होळीच्या शुभेच्छा देणारा तसंच पाणी वाया न घालवण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
 
 

Web Title: Holi celebration of Team India