दुहेरीत हर्बर्ट-माहुट जोडी अजिंक्य

By Admin | Updated: September 13, 2015 04:35 IST2015-09-13T04:35:28+5:302015-09-13T04:35:28+5:30

यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत फ्रान्सच्या पिएरे ह्युजेस हर्बर्ट व निकोलस माहुट या जोडीने ब्रिटनच्या जेमी मरे व जॉन पिअर्स या जोडीवर ६-४, ६-४ असा सहज विजय मिळवित विजेतेपदावर नाव कोरले.

Herbert-Mahout pair doubles in doubles | दुहेरीत हर्बर्ट-माहुट जोडी अजिंक्य

दुहेरीत हर्बर्ट-माहुट जोडी अजिंक्य

न्यूयॉर्क : यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीत फ्रान्सच्या पिएरे ह्युजेस हर्बर्ट व निकोलस माहुट या जोडीने ब्रिटनच्या जेमी मरे व जॉन पिअर्स या जोडीवर ६-४, ६-४ असा सहज विजय मिळवित विजेतेपदावर नाव कोरले.
हर्बर्ट-माहुट यांनी सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखत मरे व पिअर्स या जोडीला प्रतिकाराची फारशी संधी दिली नाही. यूएस ओपन पुरुष दुहेरीचा किताब जिंकणारे हर्बर्ट व माहुट ही पहिली फ्रेंच जोडी ठरली आहे. तसेच त्यांचेदेखील हे पहिलेच ग्रॅण्डस्लॅम आहे. याउलट ब्रिटनची मरे-पिअर्स जोडी ही सलग दुसऱ्यांदा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत येऊन पराभूत झाली आहे. विम्बल्डनमध्ये अंतिम फेरीतच त्यांना पराभवाची चव चाखावी लागली होती. यातील जेमी मरे हा एकेरीतील माजी विजेत्या अ‍ॅण्डी मरे याचा भाऊ आहे.

Web Title: Herbert-Mahout pair doubles in doubles