हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला केलं पराभूत, पटकावली मानाची  गदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 22:42 IST2026-03-22T21:41:48+5:302026-03-22T22:42:57+5:30

Maharashtra Kesari News: अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव करत हर्षवर्धन सदगीर याने मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Harshvardhan Sadgir Maharashtra Kesari, defeated Mahendra Gaikwad in the final match, won the prestigious mace | हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला केलं पराभूत, पटकावली मानाची  गदा

हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडला केलं पराभूत, पटकावली मानाची  गदा

अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ४-३ असा पराभव करत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गादी विभागातील विजेता हर्षवर्धन सदगीर आणि माती विभागातील विजेता महेंद्र गायकवाड यांच्यात झालेली महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत अटीतटीची आणि रोमहर्षक झाली. या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीरने दमदार खेळ करत मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावली.

तत्पूर्वी महाराष्ट्र केसरीच्या माती विभागातील अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेखवर ३-० अशी मात करत अंतिम फेरी गाठली. सुरुवातीपासूनच अटीतटीची, तुल्यबळ आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही लढत ठरली. बाहुबली अशी ओळख असलेल्या महेंद्रने आक्रमक खेळाची सुरुवात करत प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला. अनेक मैदानं गाजवलेल्या या दोन्ही दावेदारांमधील सामना कुस्तीशौकिनांसाठी उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ठरला.

गादी विभागातील अंतिम फेरीत नाशिकच्या अनुभवी हर्षवर्धन सदगीरने जय पाटीलवर एकतर्फी वर्चस्व गाजवले. सुरुवातीपासूनच खेमीची पकड घेत गुण मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हर्षवर्धनने अवघ्या अडीच मिनिटांत तांत्रिक गुणांच्या आधारे जय पाटीलचा १०-० असा पराभव करत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.

Web Title : हर्षवर्धन सदगीर ने जीता महाराष्ट्र केसरी खिताब, गायकवाड़ को हराया

Web Summary : हर्षवर्धन सदगीर ने रोमांचक फाइनल में महेंद्र गायकवाड़ को 4-3 से हराकर महाराष्ट्र केसरी का खिताब जीता। इस जोरदार मुकाबले में, मैट वर्ग के विजेता सदगीर ने मिट्टी वर्ग के चैंपियन गायकवाड़ को पछाड़कर प्रतिष्ठित गदा अपने नाम किया।

Web Title : Harshvardhan Sadgir Wins Maharashtra Kesari Title, Defeats Gaikwad

Web Summary : Harshvardhan Sadgir clinched the Maharashtra Kesari title by defeating Mahendra Gaikwad 4-3 in a thrilling final match. The intense battle saw Sadgir, the mat section winner, overcome Gaikwad, the soil section champion, to claim the prestigious Gada.