शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात-झारखंड उपांत्य लढत आजपासून

By admin | Updated: January 1, 2017 01:10 IST

रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा प्रियांक पांचाल आणि सर्वाधिक बळी घेणारा झारखंडचा शहबाज नदीम रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या

नागपूर : रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा प्रियांक पांचाल आणि सर्वाधिक बळी घेणारा झारखंडचा शहबाज नदीम रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत आमने-सामने राहणार आहे. उभय खेळाडूंचा सध्याचा फॉर्म बघता लढत रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
उभय संघांना प्रबळ दावेदार मानले जात नसले तरी यंदाच्या मोसमात तटस्थ स्थळावर खेळताना संघातील प्रतिभावान खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. गुजराततर्फे पांचालने ११०० पेक्षा अधिक धावा फटकावल्या. सलामीवीर समित गोहेलने गेल्या लढतीत विश्वविक्रमी ३५९ धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त यष्टिरक्षक कर्णधार पार्थिव पटेलच्या उपस्थितीमुळे गुजरात संघ बळकट झाला आहे. पार्थिवला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी ४०० पेक्षा कमी धावांची गरज आहे. संघाला डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची उणीव भासणार आहे. बोटावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो या लढतीत खेळणार नाही. यॉर्कर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघासाठी प्रमुख अस्त्र ठरणार आहे. बुमराहला या लढतीच्या निमित्ताने इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे मालिकेसाठी तयारी करण्याची संधी मिळणार आहे.
झारखंडची फलंदाजी बऱ्याच अंशी युवा ईशान किशनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्याने यंदाच्या मोसमात ७१९ धावा फटकावल्या आहेत. त्याने दिल्लीविरुद्ध २७३ धावांची खेळी केली होती. त्याला सौरभ तिवारी व ईशांक जग्गी या अनुभवी खेळाडूंची चांगली साथ लाभली. युवा विराट सिंग गुजरातच्या गोलंदाजांपुढे अडचण निर्माण करू शकतो. झारखंडच्या यशामध्ये भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यातील कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मेंटर म्हणून भूमिका महत्त्वाची ठरली आहे. (वृत्तसंस्था)

- झारखंडची आशा फिरकीपटू नदीमच्या कामगिरीवर अवलंबून आहे. सिव्हिल लाईन्स स्टेडियमची खेळपट्टी अनुकूल ठरेल, अशी नदीमला आशा आहे. नदीमने आतापर्यंत ५० बळी घेतले आहे. त्याला राहुल शुक्लाची योग्य साथ लाभली आहे.