शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
2
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
3
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
4
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
5
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
6
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
7
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
8
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
9
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
10
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
11
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
12
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
13
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
14
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
15
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
16
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
17
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
19
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
20
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?

श्रीलंकेचा शानदार विजय

By admin | Published: March 02, 2015 12:59 AM

अनुभवी कुमार संगकारा व युवा लाहिरू तिरिमाने यांच्या वैयिक्तक शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला

वेलिंग्टन : अनुभवी कुमार संगकारा व युवा लाहिरू तिरिमाने यांच्या वैयिक्तक शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला आणि विश्वकप क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीच्या दिशेने कूच केली. इंग्लंडतर्फे जो रुटची (१२१) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना इंग्लंडने रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद ३०९ धावांची दमदार मजल मारली. पण इंग्लंडचे गोलंदाज व क्षेत्ररक्षक धावसंख्येचा बचाव करण्यात सपशेल अपयशी ठरले. संगकारा (नाबाद ११७) अणि तिरिमाने (नाबाद १३९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी २१२ धावांची अभेद्य भागीदारी करीत श्रीलंकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बाद फेरी गाठण्यासाठी इंग्लंडपुढे आता ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेने विजयासाठी आवश्यक धावा ४७.२ षटकांत १ गडी गमावीत पूर्ण केल्या. सलामी लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या श्रीलंका संघाचा हा सलग तिसरा विजय ठरला. श्रीलंका संघाने ४ सामन्यांत ६ गुणांची कमाई केली आहे. चार सामने खेळणाऱ्या इंग्लंडच्या खात्यावर केवळ २ गुणांची नोंद आहे. इंग्लंडला अद्याप बाद फेरी गाठण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामन्यांत विजय मिळवावा लागेल आणि अन्य सामन्यांचे निकाल अनुकूल ठरावे, यासाठी प्रार्थना करावी लागेल. संगकाराने कारकीर्दीतील २३ वे शतक झळकावले. त्याने ८६ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार व २ षटकार लगाविले. संगकाराने ७० चेंडूंमध्ये शतक झळकाविताना श्रीलंकेतर्फे विश्वकप स्पर्धेत सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. २५ वर्षींय तिरिमाने या स्पर्धेत शतक झळकाविणारा श्रीलंकेचा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला. त्याने १४३ चेंडू खेळताना १३ चौकार व २ षटकार लगाविले.