शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मायकल क्लार्कचा 'वनडे'ला अलविदा

By admin | Updated: March 28, 2015 09:21 IST

ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर वनडे क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २८ - विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी अवघ्या काही तासांवर आलेली असतानाच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे आणि त्याचे कारण आहे कर्णधार मायकेल क्लार्कचा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय. उद्या (रविवार) पार पडणा-या विषश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर मायकेल क्लार्क वनडे क्रिकेटला अलविदा करणार आहे. खुद्द क्लार्कनेच ही घोषण केली.
'उद्या माझा शेवटचा वनडे सामना असेल. याबाबत मी माझे प्रशिक्षक आणि संघातील सहका-यांशी चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियातर्फे खेळायला मिळालं हे मी माझं भाग्य मानतो. पुढील विश्वचषकापर्यंत मी शारिरीकदृष्ट्या फिट असेन याची खात्री नाही, त्यामुळे निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे'  असे सांगत क्लार्कने त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. 
३३ वर्षीय मायकेल क्लार्कने २००३ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सूरूवात केली असून आत्तापर्यंत त्याने २४४ वनडे सामने खेळले आहेत. चार वर्षांपूर्वी त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र गेल्या काही काळापासून तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त असून त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटीत मालिकेतही त्याला खेळता आले नव्हते. मात्र योग्य ते उपचार आणि परीश्रम घेऊन तो हा वर्ल्डकप खेळण्यास सज्ज झाला होता.  पण त्या दुखण्याने पुन्हा उचल खाल्ल्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मायकेल क्लार्कची वनडे कारकीर्द
वनडे सामने : २४४
धावा : ७९०७
शतके : ८
अर्धशतक : ५७
सर्वोच्च धावसंख्या : १३०